कुंभमेळ्यादरम्यान गंगेत आंघोळ करणाऱ्या महिलांचे फोटो प्रसिद्ध करण्यात आली बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 02:19 AM2019-02-10T02:19:42+5:302019-02-10T07:50:39+5:30

कुंभमेळ्यादरम्यान गंगेत आंघोळ करणा-या महिलांचे फोटो प्रसिद्ध करू नयेत, असे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने मुद्रित व दर्श माध्यमांना दिले आहेत. गंगेच्या घाटाच्या १०० मीटर परिसरातील फोटोंवरही उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे.

Photos of women bathing in Ganges during Kumbh Mela were published | कुंभमेळ्यादरम्यान गंगेत आंघोळ करणाऱ्या महिलांचे फोटो प्रसिद्ध करण्यात आली बंदी

कुंभमेळ्यादरम्यान गंगेत आंघोळ करणाऱ्या महिलांचे फोटो प्रसिद्ध करण्यात आली बंदी

googlenewsNext

नवी दिल्ली : कुंभमेळ्यादरम्यान गंगेत आंघोळ करणा-या महिलांचे फोटो प्रसिद्ध करू नयेत, असे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने मुद्रित व दर्श माध्यमांना दिले आहेत. गंगेच्या घाटाच्या १०० मीटर परिसरातील फोटोंवरही उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. या आदेशामुळे वृत्तपत्रे, साप्ताहिके अथवा अन्य नियतकालिकांना महिलांच्या आंघोळींचे फोटो छापता येणार नाहीत. तसेच टीव्ही वाहिन्यांना आंघोळीची दृश्ये अथवा फोटो दाखविता येणार नाहीत. न्या. पीकेएस बघेल आणि पंकज भाटिया यांनी हे आदेश दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशारा न्यायालयाने दिला आहे. असीम कुमार नामक व्यक्तीने यासंबंधीची याचिका दाखल केली आहे. याचिकेवरील पुढील सुनावणी ५ एप्रिल रोजी होणार आहे. हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यात ४९ दिवस हा उत्सव चालतो. प्रयागराज येथील ३,२०० हेक्टरवर कुंभमेळा विस्तारला आहे. सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. १५ जानेवारी रोजी सुरू झालेला हा कुंभमेळा ४ मार्च रोजी संपणार आहे. दरम्यान, कुंभमेळ््यात ९ विदेशी व्यक्तींनी संन्यास दीक्षा घेतली आहे.

आज तिसरे शाही स्नान
कुंभमेळ्यात रविवारी वसंत पंचमीच्या मुहूर्तावर प्रयाग संगमावर तिसरे शाही स्नान होणार आहे. या सोहळ्यात २ कोटी भाविक संगमावर स्नान करतील, अशी अपेक्षा आहे. या कुंभमेळ्यातील हे शेवटचे शाही स्नान असेल. याआधी दोन शाही स्नाने झाली आहेत. पहिले शाही स्नान मकरसंक्रांतीला १५ जानेवारी रोजीला तर दुसरे शाही स्नान मौनी अमावास्येला ४ फेब्रुवारी रोजी झाले होते. शाही स्नान हा कुंभमेळ्याचा मुख्य विधी आहे.

पुजारी ध्रुबो
भट्टाचार्य म्हणाले की...
अनेक कुटुंबे (विशेषत: बंगाली) आपल्या लहान मुलांना घेऊन वसंत पंचमीच्या दिवशी त्यांच्याच बोटांनी पहिले अक्षर लिहिण्यास प्रोत्साहन देतात, तर काही जण संगीताचा अभ्यास करतात.

Web Title: Photos of women bathing in Ganges during Kumbh Mela were published

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.