Fact Check : मुलीच्या लग्नासाठी मोदी सरकार देतंय ४० हजार रुपये; जाणून घ्या 'त्या' मेसेजमागचं सत्य
By कुणाल गवाणकर | Updated: January 27, 2021 14:17 IST2020-11-01T11:43:06+5:302021-01-27T14:17:59+5:30
pradhanmantri kanya vivah yojana fact check: प्रधानमंत्री कन्या विवाह योजने'बद्दल पीआयबीचं स्पष्टीकरण

Fact Check : मुलीच्या लग्नासाठी मोदी सरकार देतंय ४० हजार रुपये; जाणून घ्या 'त्या' मेसेजमागचं सत्य
नवी दिल्ली: कोरोना संकट काळात सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारनं अनेक योजना आणल्या. आत्मनिर्भर भारत पॅकेजच्या माध्यमातून सरकारकडून महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. यानंतर आता एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा मेसेज 'प्रधानमंत्री कन्या विवाह योजने'शी संबंधित आहे.
'प्रधानमंत्री कन्या विवाह योजने'च्या माध्यमातून सरकार मुलींच्या लग्नासाठी ४० हजार रुपये देणार असल्याचा एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मात्र हा मेसेज खोटा असल्याची माहिती पुढे आली आहे. पीआयबी फॅक्ट चेकने ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. सरकार मुलींच्या लग्नासाठी पैसे बँक खात्यात जमा करत नसल्याचं पीआयबीनं स्पष्ट केलं आहे. सध्या सरकारची अशी कोणतीही योजना नसल्याचं पीआयबीनं म्हटलं आहे.
दावा: #Youtube पर एक वीडियो में यह दावा किया जा रहा है कि केंद्र सरकार ‘प्रधानमंत्री कन्या विवाह योजना’ के तहत बेटियों को उनके विवाह के लिए ₹40,000 तक की धनराशि दे रही है।#PIBFactCheck: यह दावा फर्जी है। केंद्र सरकार द्वारा ऐसी कोई योजना नहीं चलाई जा रही है। pic.twitter.com/P7gvmDKFJr
— PIB Fact Check (@PIBFactCheck) October 31, 2020
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं व्हायरल झालेल्या मेसेजमागील सत्य सांगितलं आहे. केंद्र सरकार 'प्रधानमंत्री कन्या विवाह योजने'च्या अंतर्गत मुलींच्या विवाहासाठी ४० हजार रुपये देत असल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला. मात्र हा दावा बोगस असल्याची माहिती पीआयबीच्या फॅक्ट चेक टीमनं दिली आहे. अशा प्रकारची कोणतीही योजना सरकारनं सुरू केली नसल्याचं पीआयबीनं स्पष्ट केलं आहे.