पंजाबमध्ये पिकअप झाडावर आदळून भीषण अपघात; 10 ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 19:18 IST2019-05-09T19:17:20+5:302019-05-09T19:18:16+5:30
पिकअप वाहनाच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याशेजारील झाडावर जाऊन आदळले.

पंजाबमध्ये पिकअप झाडावर आदळून भीषण अपघात; 10 ठार
होशियारपूर : पंजाबमधील होशियारपूरमध्ये मोठा अपघात झाला आहे. या अपघातात 10 जण ठार तर 13 जण मृत्यू झाले आहेत.
पिकअप वाहनाच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याशेजारील झाडावर जाऊन आदळले. यामध्ये 3 मुलांसह 10 जण ठार झाले आहेत. हे सर्वजण हिमाचल प्रदेशच्या पीर निगाहा येथून परतत होते. यावेळी होशियारपूरच्या रस्त्यावर चालकाचे पिकअपवरील नियंत्रण सुटल्याने वाहन झाडावर जाऊन आदळले.
पंजाबमध्ये पिकअप झाडावर आदळून भीषण अपघात; 10 ठार, 13 जखमी
— Lokmat (@MiLOKMAT) May 9, 2019
हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये तीन मुले, दोन महिलांसह 10 जण जागीच ठार झाले. तर 13 जण जखमी झाले आहेत. अपघातस्थळी तताडीने मदत पोहचविण्यात आली आहे. हे सर्वजण रमजान साजरा करण्यासाठी हिमाचल प्रदेशमध्ये गेले होते. ते दसुहाच्या उस्मान गावातील राहाणारे आहेत.