Picture of The Day: पिक्चर ऑफ द डे! तुर्कीश महिलेने मारली भारतीय सैन्याच्या महिला अधिकाऱ्याला मिठी; ढसाढसा रडली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 10:23 PM2023-02-09T22:23:08+5:302023-02-09T22:27:21+5:30
Turkey Earthquake: भारताने तुर्की आणि सिरीयामध्ये मदत पोहोचविण्यासाठी ऑपरेशन दोस्त सुरु केले आहे. तसे पाहता तुर्कस्तान हा भारताचा विरोधक देश आहे.
तुर्कस्तान आणि सीरियामध्ये आलेल्या भीषण भूकंपांमध्ये जीव गमावणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. ताज्या आकडेवारीनुसार मृतांच्या आकड्याने १९००० चा टप्पा ओलांडला आहे. असे असताना सिरीयाने भारतीयांकडे मदतीचे हात पसरले आहेत. भारतीय लोकांनी शक्य तेवढी मदत करावी, अशी विनंती सिरीयाने केली आहे. अशातच अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेणारा फोटो क्लिक झाला आहे.
भारताने तुर्की आणि सिरीयामध्ये मदत पोहोचविण्यासाठी ऑपरेशन दोस्त सुरु केले आहे. तसे पाहता तुर्कस्तान हा भारताचा विरोधक देश आहे. तेथील राज्यकर्ते पाकिस्तानला काश्मीर मिळविण्यासाठी प्रोत्साहन देतात. असे असले तरी भारताने हे सारे विसरून मैत्रीचा हात पुढे केला आहे. भारतीय लष्कर आणि एनडीआरएफच्या टीमा तातडीने तुर्कीमध्ये दाखल झाल्या आहेत.
भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय लष्कराने आपत्ती निवारण पथके आणि आर्मी फील्ड हॉस्पिटल तैनात केले आहेत. या पथकातील भारतीय कन्येला एका तुर्कीश महिलेने मीठी मारल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. भारतीय सैन्य करत असलेल्या मदतीमुळे या महिलेने आभार मानले आहेत.
A Turkish woman hugs a woman officer of the Indian Army and gives her a peck, in an earthquake-affected area of Turkey.
— ANI (@ANI) February 9, 2023
Indian Army has deployed disaster relief teams and Army Field Hospital to help the victims of the earthquake. #TurkeyEarthquakepic.twitter.com/CaGIFRxiIf