तीर्थक्षेत्राचा दर्जा
By admin | Published: May 30, 2016 12:37 AM2016-05-30T00:37:51+5:302016-05-30T00:37:51+5:30
नशिराबाद- ग्रामदैवत संत झिपरुअण्णा महाराज मंदिराला तीर्थक्षेत्राचा क दर्जा मिळाला आहे. जिल्हा परिषद विकास तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून काही प्रमाणात काम झाले. तत्कालिन सभापती कमलाकर रोटे व स्मारक समितीच्या प्रयत्नांमुळे नदीपात्र परिसरात विकास काम झाले. त्यानंतर आजपर्यंत कुठलेही काम झाले नसल्याची खंत झिपरुअण्णा महाराज स्मारक समितीच्या पदाधिकार्यांनी व्यक्त केली. तीर्थक्षेत्र विकास निधीतून श्रींच्या मंदिर परिसरात सौंदर्यीकरण व कायापालट, विकास कामे होणे अपेक्षित आहे. यासंदर्भात लोकप्रतिनिधी पाठपुरावा करुन विकास कामे करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Next
न िराबाद- ग्रामदैवत संत झिपरुअण्णा महाराज मंदिराला तीर्थक्षेत्राचा क दर्जा मिळाला आहे. जिल्हा परिषद विकास तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून काही प्रमाणात काम झाले. तत्कालिन सभापती कमलाकर रोटे व स्मारक समितीच्या प्रयत्नांमुळे नदीपात्र परिसरात विकास काम झाले. त्यानंतर आजपर्यंत कुठलेही काम झाले नसल्याची खंत झिपरुअण्णा महाराज स्मारक समितीच्या पदाधिकार्यांनी व्यक्त केली. तीर्थक्षेत्र विकास निधीतून श्रींच्या मंदिर परिसरात सौंदर्यीकरण व कायापालट, विकास कामे होणे अपेक्षित आहे. यासंदर्भात लोकप्रतिनिधी पाठपुरावा करुन विकास कामे करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.स्मारक समितीच्या भावी संकल्पनाझिपरुअण्णा महाराज स्मारक समितीतर्फे विविध संकल्पनांचा आराखडा तयार आहे त्यात परिसरात सौंदर्यीकरण करुन उद्यान, वॉटर टँक, भव्य ध्यान पारायण सभागृह, अन्नछत्र सभागृह, अण्णासागर आदी संकल्पना आहे. दर गुरुवारी देण्यात येणारा पिठल भाकरीचा महाप्रसाद भाविकांच्या योगदानातून दररोज महाप्रसाद वाटप करण्याची संकल्पना आहे. शेगाव-शिर्डी- अक्कलकोट प्रमाणे येथेही अन्नछत्र दररोज सुरू करावे, असा मानस असल्याचे स्मारक समितीने व्यक्त केला आहे. त्याबाबत पाऊले उचलली जाणार असल्याचे सांगण्यात आले.श्रींच्या पुण्यतिथी उत्सव तयारीला वेगश्रींची पुण्यतिथी सोहळा सोमवारी होत आहे. वैशाख वद्य नवमीला अर्थात् २१ मे १९४९ रोजी संत झिपरुअण्णामहाराज यांचे निर्वाण झाले. श्रींची पुण्यतिथी सोहळ्याची जय्यत तयारी पूर्णत्वाकडे येत आहे. पालखीस स्नान घालणे, पूर्व तयारी करणे आदी कामांची लगबग सुरू आहे. गावातील प्रमुख मार्गावरुन शोभायात्रा पालखी काढण्याची प्रथा आजही सुरू आहे. श्रींचे ज्यास्थानी निर्वाण झाले त्या जागी श्री कुळकर्णी यांचे घरी पालखी नेण्यात येते. तेथे विधिवत पूजन करुन पालखी सोहळा मंदिरात दुपारी येत असतो. महाआरती महाप्रसाद वाटप होतो. महाप्रसादासाठी लागणारे साहित्य आदी नियोजन सुरु आहे.झिपरुअण्णा महाराज स्मारक समितीचे रमेश सराफ, विनायक वाणी, ॲड.मोहन देशपांडे, सुरेश अकोले, मंगल तारे, कैलास व्यवहारे, सुधीर मोहरीर, गणपत भारुळे, जयंत गुरव आदी परिश्रम घेत आहेत.