भटक्या कुत्र्याने जोडले तीर्थयात्रेचे पुण्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 01:38 AM2018-01-15T01:38:34+5:302018-01-15T01:38:50+5:30

तीर्थयात्रेला जाऊन फक्त माणूसच गाठीशी पुण्य जोडतो, असे नाही. कदाचित, ती आस प्राण्यांनाही असावी. असाच विरळा अनुभव अलीकडेच शबरीमलाची यात्रा केलेल्या भाविकांच्या एका तुकडीला आला

Pilgrim's pilgrimage to the wandering dog! | भटक्या कुत्र्याने जोडले तीर्थयात्रेचे पुण्य!

भटक्या कुत्र्याने जोडले तीर्थयात्रेचे पुण्य!

Next

बंगळुरू : तीर्थयात्रेला जाऊन फक्त माणूसच गाठीशी पुण्य जोडतो, असे नाही. कदाचित, ती आस प्राण्यांनाही असावी. असाच विरळा अनुभव अलीकडेच शबरीमलाची यात्रा केलेल्या भाविकांच्या एका तुकडीला आला. या भाविकांसोबत गेलेल्या रस्त्यातील एका भटक्या कुत्र्यानेही जातानाची सुमारे ५०० किमीची पदयात्रा केली व येताना तो सोबतच रेल्वेने परत आला. या कुत्र्याच्या अजोड कृतीने भाविक भारावले.
गेल्या १७ डिसेंबरला हलसुरु येथील १६ भाविक पदयात्रा करत शबरीमलाला निघाले. हे भाविक होसूरमार्गे पुढे जात असताना, त्या गटातील सी. मदनकुमार यांच्यासोबत एक कुत्राही चालू लागला. तो कुत्रा व मदनकुमार यांची गट्टीच जमली. हळूहळू तो कुत्रा या साºयाच भाविकांचा लाडका झाला. ‘भैरव’ नावाने ते त्याला हाक मारू लागले. पदयात्रा पुढे जात होती. २७ डिसेंबरचा तो दुर्दैवी दिवस उजाडला. दिंडिगल जिल्ह्यातील सेमबत्ती येथे ही पदयात्रा आली असता, एका भरधाव कारने सी. मदनकुमार यांना धडक दिली. भाविकांच्या गटातील काही जण गंभीर जखमी झालेल्या मदनकुमार यांना प्रथम दिंडिगल व नंतर मदुराई येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्यांच्यासोबत गेले. मात्र, सी. मदनकुमार यांचे उपचारादरम्यान निधन झाले. या गटातील जे इतर भाविक सेमबत्ती येथे थांबले होते, त्यांच्यासोबत भैरव हा कुत्राही होताच. एका क्षणी या मुक्या प्राण्याला काय वाटले माहीत नाही, पण त्याने या भाविकांची साथ सोडली. दुसºया भाविकांचा एक गट शबरीमलाला पदयात्रा करत निघाला होता. सोबत भैरवही निघाला. दरम्यान, सेमबत्ती येथे जो भाविकांचा गट काही काळ थांबला. तोही काही दिवसांनी शबरीमलाला पोहोचला. तिथे जाऊन पाहतात तो काय, साक्षात भैरव कुत्रा त्यांच्या समोर दत्त म्हणून हजर!
दर्शन घेऊन परतताना आता या ‘भैरव’चे करायचे काय, असा प्रश्न या भाविकांना पडला. त्याला येथेच सोडून जा, असे पुजारी मंडळींनी सुचविले. त्याप्रमाणे त्याला मंदिराच्या आवारात सोडून हे भाविक पम्पा बस स्टँडवर गेले, तर भैरव त्यांच्या आधी तेथे जाऊन उभा होता. (वृत्तसंस्था)

Web Title: Pilgrim's pilgrimage to the wandering dog!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :dogकुत्रा