‘बिनपगारी रजा’ जाहीर केल्याने पायलट संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 11:08 PM2020-07-20T23:08:04+5:302020-07-20T23:08:09+5:30
राष्ट्रीय हवाई वाहतूक कंपनीच्या हिताचा नाही, असे पायलटांच्या संघटनेने एअर इंडियाला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
नवी दिल्ली : एअर इंडियाने आपल्या पायलटांसाठी बिनपगारी रजा घोषित केल्यामुळे पायलट संतप्त झाले आहेत. ‘बिनपगारी रजां’चा निर्णय एकतर्फी आणि पायलटांना विश्वासात न घेता जाहीर केला गेला असून, उभय पक्षांनी मान्य केलेल्या वेतन करारात अशाप्रकारे एकतर्फी फेरबदल बेकायदेशीर असून, राष्ट्रीय हवाई वाहतूक कंपनीच्या हिताचा नाही, असे पायलटांच्या संघटनेने एअर इंडियाला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
एअर इंडियाच्या पायलटांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘इंडियन कमर्शिअर पायलट असोसिएशन’ने एअर इंडियाचे चेअरमन राजीव बन्सल यांना पत्र पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, अशा प्रकारच्या एकतर्फी निर्णयामुळे परिस्थिती विकोपाला जाण्याची शक्यता आहे. आमच्या वेतनाचा ७0 टक्के हिस्सा उड्डाण भत्ता आणि इतर भत्त्याच्या स्वरूपात आहे. तो एप्रिल २0२0 पासून मिळालेला नाही.