पिंप्राळा हुडको दंगलीतील ९ संशयितांना जामीन
By admin | Published: April 10, 2016 12:34 AM2016-04-10T00:34:14+5:302016-04-10T00:34:14+5:30
जळगाव : पिंप्राळा हुडको परिसरात ४ एप्रिल रोजी रात्री ७.३० ते ८ वाजेदरम्यान दोन गटात झालेल्या दंगल प्रकरणातील एका गटाच्या ९ संशयित आरोपींची शनिवारी न्यायालयाने जामिनावर सुटका केली.
Next
ज गाव : पिंप्राळा हुडको परिसरात ४ एप्रिल रोजी रात्री ७.३० ते ८ वाजेदरम्यान दोन गटात झालेल्या दंगल प्रकरणातील एका गटाच्या ९ संशयित आरोपींची शनिवारी न्यायालयाने जामिनावर सुटका केली.क्षुल्लक कारणावरून उसळलेल्या दंगल प्रकरणी शेख जावेद शेख लुकमान (वय ३२, रा.पिंप्राळा हुडको, जळगाव) याच्या फिर्यादीवरून एका गटातील संशयित आरोपी उज्ज्वला रमेश शिरसाळे (३५), दीपक युवराज सोनवणे (३२), चुडामण युवराज सोनवणे (३५), करण उर्फ हितेश नीळकंठ सोनवणे (१८), रमेश सुकदेव सोनवणे (३८), नीळकंठ उर्फ पिंटू सुकदेव शिरसाळे (३६), प्रकाश उर्फ पक्या सुकदेव शिरसाळे (४५), स्वप्नील दिलीप खंडारे (२२) व गुलाब वामन गायकवाड (४०) (सर्व रा.पिंप्राळा हुडको, जळगाव) यांच्यासह इतर १०० ते १२५ जणांविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम १४३, १४७, १४९, ४५२, ३३६, २९५, ३२३, ५०४, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी वरील संशयितांना अटक केली होती. अटकेनंतर ते ९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत होते. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना शनिवारी दुपारी न्यायाधीश आर.बी. ठाकूर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. सरकारतर्फे ॲड.हेमंत मेंडकी यांनी तर आरोपींतर्फे ॲड.अजय सिसोदिया यांनी कामकाज पाहिले.९ जणांना जामीनसंशयित आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर त्यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. न्यायालयाने उज्ज्वला शिरसाळे, दीपक सोनवणे, चुडामण सोनवणे, करण उर्फ हितेश शिरसाळे, रमेश शिरसाळे, नीळकंठ उर्फ पिंटू शिरसाळे, प्रकाश उर्फ पक्या शिरसाळे, स्वप्निल खंडारे, गुलाब गायकवाड यांना जामीन मंजूर केला.