पिनाराई विजयन केरळचे नवे मुख्यमंत्री

By Admin | Published: May 25, 2016 07:29 PM2016-05-25T19:29:30+5:302016-05-25T20:19:26+5:30

केरळमध्ये डाव्यांच्या डेमोक्रेटिक फ्रंटला बहुमत मिळालं असून, काँग्रेस सत्तेवरून पायउतार झाली

Pinarai Vijayan is the new chief minister of Kerala | पिनाराई विजयन केरळचे नवे मुख्यमंत्री

पिनाराई विजयन केरळचे नवे मुख्यमंत्री

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत

केरळ, दि. 25- केरळमध्ये डाव्यांच्या डेमोक्रेटिक फ्रंटला बहुमत मिळालं असून, काँग्रेस सत्तेवरून पायउतार झाली आहे. केरळमध्ये एलडीएफनं 91 जागा जिंकत वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. तर काँग्रेससह मित्र पक्षांचे 47 उमेदवार विजयी झाले आहेत.
डेमोक्रेटिक फ्रंटच्या पिनाराई विजयन यांनी मुख्यमंत्रिपदाची आज  शपथ ग्रहण केली आहे. केरळचे राज्यपाल पी. सदाशिवम यांनी पिनाराई विजयन यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. पिनाराई विजयन यांच्यासह डेमोक्रेटिक फ्रंटच्या 18 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
ए. पी. जयाराजन, टी. एम. थॉमस इसाक, जी. सुधाकरन, ए. के. बालन, के. के. शैलजा, सी. रविचंद्रनाथ, कदकमपल्ली सुरेंद्रन, टी. पी. रामकृष्णन, जे. मरकुट्टी अम्मा, ए. सी. मोईडीन, के. टी जलील, ए. चंद्रशेखरन, व्ही. एस. सुनील कुमार, पी. थिलोथमन, के. राजू, मॅथ्यू टी. थॉमस, ए. के. ससींद्रन, रामचंद्रन कडनापल्ली आदी आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. 

Web Title: Pinarai Vijayan is the new chief minister of Kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.