गाझियाबादमध्ये महिलांसाठी पिंक ऑटो सेवा सुरु

By admin | Published: July 13, 2016 05:15 PM2016-07-13T17:15:54+5:302016-07-13T17:15:54+5:30

शहरात रात्रच्यावेळी महिलांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा, यादृष्टीकोनाने पिंक ऑटो रिक्षा सुरु करण्यात करण्यात आली आहे. या पिंक ऑटो रिक्षा योजनेला काल पोलिसांनी

In Pink City, Pink Auto started service for women | गाझियाबादमध्ये महिलांसाठी पिंक ऑटो सेवा सुरु

गाझियाबादमध्ये महिलांसाठी पिंक ऑटो सेवा सुरु

Next

ऑनलाइन लोकमत
गाझियाबाद, दि. १३ - शहरात रात्रच्यावेळी महिलांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा, यादृष्टीकोनाने पिंक ऑटो रिक्षा सुरु करण्यात करण्यात आली आहे. या पिंक ऑटो रिक्षा योजनेला काल पोलिसांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर आज पहिल्या टप्प्यात २० पिंक रिक्षा रस्त्यावर उतरल्या आहेत.
शहरात महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षित व सुखकर प्रवासासाठी आम्ही या पिंक रिक्षा सेवेला मंजूरी दिली आहे. तसेच, ऑटो रिक्षा चालकाची सर्व माहिती आम्ही घेतली आहे. यामध्ये त्यांचे नाव, कुटुंबियांची माहिती, पत्ता, फोन नंबर आदींची नोंद केली आहे, असे येथील पोलीस अधीक्षक के. एस. इमानुएल यांनी सांगितले.
आता पिंक रिक्षा योजना फक्त ट्रान्स हिंडन परिसरात सुरु करण्यात आली आहे. जर ही योजना यशस्वी झाली तर यामध्ये आणखी रिक्षांचा समावेश करण्यात येणार, असेही पोलीस अधीक्षक के. एस. इमानुएल यांनी सांगितले.

Web Title: In Pink City, Pink Auto started service for women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.