Pitbull Attack: पिटबुल तरुणाच्या गुप्तांगाला चावला, जमावाकडून कुत्रा ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 09:25 AM2023-04-16T09:25:48+5:302023-04-16T09:25:58+5:30

Pitbull Attack: हरयाणातील कर्नालमध्ये पिटबुल प्रजातीच्या कुत्र्याने शेतात काम करणाऱ्या ३० वर्षांच्या तरुणावर हल्ला केला आणि गुप्तांगाला चावा घेतला. तरुण गंभीर जखमी झाला असून प्रकृती चिंताजनक आहे.

Pitbull bites youth's privates, dog killed by mob | Pitbull Attack: पिटबुल तरुणाच्या गुप्तांगाला चावला, जमावाकडून कुत्रा ठार

Pitbull Attack: पिटबुल तरुणाच्या गुप्तांगाला चावला, जमावाकडून कुत्रा ठार

googlenewsNext

हरयाणातील कर्नालमध्ये पिटबुल प्रजातीच्या कुत्र्याने शेतात काम करणाऱ्या ३० वर्षांच्या तरुणावर हल्ला केला आणि गुप्तांगाला चावा घेतला. तरुण गंभीर जखमी झाला असून प्रकृती चिंताजनक आहे. कुत्र्याच्या तोंडात कपडा कोंबून त्याने आपला जीव वाचवला. तर, संतप्त गावकऱ्यांनी कुत्र्याला काठीने मारून ठार केले.

बिजना गावातील करण शर्मा गुरुवारी सकाळी शेतात काम करत होता. शेतात गव्हाच्या पेंढ्या करण्यासाठी कापणी यंत्र उभे होते. त्याखाली कुत्रा बसला होता. करण मशीनजवळ पोहोचताच कुत्र्याने त्याच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला केला. खूप प्रयत्न करूनही न सोडल्याने करणने जवळच पडलेला कपडा

कुत्र्याच्या तोंडात कोंबला आणि सुटका करून घेतली. मात्र, तोपर्यंत तो गंभीर जखमी झाला होता. तरुणाचा आरडाओरडा ऐकून लोक घटनास्थळी पोहोचले. रक्तस्राव होत असल्याने करणला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक पाहून डॉक्टरांनी कर्नालच्या शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगितले. त्याच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत.

गेल्या आठवडाभरापासून कुत्रा गावात फिरत होता, दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीवर हल्लाही केला होता असे तरुणाच्या नातेवाइकांनी सांगितले. याची माहिती पोलिसांनाही देण्यात आली असून पोलिस कुत्र्याच्या मालकाचा शोध घेत आहेत. ही धक्कादायक घटना व्हायरल झाली असून भटक्या कुत्र्यांसह पिटबुल, रॉटविलर अशा पाळीव कुत्र्यांच्या हल्ल्याच्या बातम्याही सतत येत असल्याने नेटकऱ्यांमध्ये चर्चा आहे.

Web Title: Pitbull bites youth's privates, dog killed by mob

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :dogकुत्रा