नदी पात्रातील खड्डे ठरताहेत जिवघेणे
By admin | Published: December 6, 2015 11:51 PM2015-12-06T23:51:36+5:302015-12-06T23:51:36+5:30
अवैध वाळू वाहतुकदारांकडून जेसीबीच्या साहाय्याने वाळूचा उपसा केला जात असल्यामुळे नदी पात्रात मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहे. यामुळे आव्हाणे, फुपनगरी, दापोरी या भागातील अनेक तरुण व शेतकरी या खड्यांमध्ये बुडून मरण पावल्याच्या दुख:द घटना मागील काळात घडल्या आहेत. वाळू चोरांची मनमानी आणि जिल्हा प्रशासनाची चालढकल वृत्ती यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत असताना निष्पाप गावकर्यांचे मात्र बळी जात आहेत.
Next
अ ैध वाळू वाहतुकदारांकडून जेसीबीच्या साहाय्याने वाळूचा उपसा केला जात असल्यामुळे नदी पात्रात मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहे. यामुळे आव्हाणे, फुपनगरी, दापोरी या भागातील अनेक तरुण व शेतकरी या खड्यांमध्ये बुडून मरण पावल्याच्या दुख:द घटना मागील काळात घडल्या आहेत. वाळू चोरांची मनमानी आणि जिल्हा प्रशासनाची चालढकल वृत्ती यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत असताना निष्पाप गावकर्यांचे मात्र बळी जात आहेत.ठेकेदार गब्बर मात्र पर्यावरणाकडे दुर्लक्षमहसूलची वसुली करण्यात अपयशी ठरलेल्या दोन तलाठ्यांना निलंबित तर २२ तलाठ्यांची एक वर्षाची वेतनवाढ जिल्हाधिकारी यांनी दोन दिवसांपूर्वी थांबविली आहे. जमीन महसूलच्या वसुलीसाठी तलाठ्यांवर कारवाई केली जात असताना वाळू चोरी रोखण्यासंदर्भात काय उपाययोजना केली. तसेच वाळू चोरांवर कारवाई करून दंडात्मक कारवाई करीत किती महसूल संकलित केला याबाबत महसूल प्रशासनाने आक्रमक होणे गरजेचे आहे.