पीयूष गोयल आणि पी. चिदंबरम, सुरेश प्रभूंची राज्यसभेवर बिनविरोध निवड
By admin | Published: June 3, 2016 03:53 PM2016-06-03T15:53:42+5:302016-06-03T19:37:03+5:30
राज्यसभेसाठी झालेली निवडणूक बिनविरोध झाली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3- राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 6 जागांसाठीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत असलेले 6 उमेदवार विजयी झाले आहेत. आंध्र प्रदेशमधून रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंना राज्यसभेवर पाठवण्यात आलं आहे. लालूंच्या कन्या मिसा भारती आणि राम जेठमलानी यांचीही राज्यसभेसाठी निवड झाली आहे.
भाजपचे नेते आणि केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचीही राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. राज्यसभेच्या एकूण 6 जागांसाठी निवडणूक झाली. राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, भाजपाचे विनय सहस्रबुद्धे आणि विकास महात्मे यांची राज्यसभेवर दुस-यांचा वर्णी लागली आहे. तर शिवसेनेच्या संजय राऊत यांची राज्यसभेवर निवड झाली असून, ते पुन्हा एकदा खासदार झाले आहेत.
चिदंबरम यांचा मुलगा कांती तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत शिवगंगा या मतदारसंघातून पडला होता. त्यामुळे 2014च्या लोकसभा निवडणुकीत चिदंबरम उभे राहिले नव्हते. मात्र काँग्रेसची बाजू राज्यसभेत ठामपणे मांडण्यासाठी पी. चिदंबरम यांना राज्यसभेवर पाठवण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.