“कोरोनाच्या काळात पंतप्रधान मोदी १८-१९ तास काम करतायत, राजकारण करू नका”

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 01:22 PM2021-04-19T13:22:59+5:302021-04-19T13:25:40+5:30

corona situation: केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप सुरू आहे.

piyush goyal says pm narendra modi working 18 to 19 hours in a day in corona situation | “कोरोनाच्या काळात पंतप्रधान मोदी १८-१९ तास काम करतायत, राजकारण करू नका”

“कोरोनाच्या काळात पंतप्रधान मोदी १८-१९ तास काम करतायत, राजकारण करू नका”

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनावरून राजकारण न करण्याचे आवाहनपंतप्रधान मोदी १८ ते १९ तास काम करतायतऑक्सिजन एक्सप्रेस ट्रेन चालवण्याच्या दृष्टीतून ग्रीन कॉरिडोअर

नवी दिल्ली: संपूर्ण देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाःकार माजवल्याचे चित्र आहे. मागील सलग काही दिवस देशातील कोरोना रुग्णांची संख्या दोन लाखांच्या पार गेली आहे. अनेक राज्यांमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्सची कमतरता, कोरोना लसींचा तुडवडा जाणवत आहे. केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार कोरोनाच्या लढाईत राज्य सरकारांसोबत आहे. केंद्र कोणताही भेदभाव करत नसल्याचे केंद्रीय पियुष गोयल यांनी म्हटले आहे. (piyush goyal says pm narendra modi working 18 to 19 hours in a day in corona situation)

पंतप्रधाननरेंद्र मोदी पश्चिम बंगालच्या निवडणूक दौऱ्यावरून परतल्यानंतरही दिवसातील १८ ते १९ तास काम करत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितीवरून कुणीही राजकारण करू नये, असे आवाहन गोयल यांनी केले. एएनआयला दिलेल्या विशेष मुलाखतीवेळी ते बोलत होते. पियुष गोयल यांनी ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी ऑक्सिजन एक्सप्रेस ट्रेन चालवण्याच्या दृष्टीतून ग्रीन कॉरिडोअर तयार केला जात असल्याची माहिती दिली. 

कुंभमेळा असो वा रमजान, कोरोना नियमांचे पालन अशक्य: अमित शाह

केंद्र सरकार भेदभाव करत नाही

कोरोना परिस्थितीवरून राजकारण करू नये. केंद्र सरकार कोरोनाविरुद्ध लढाई कोणताही भेदभाव न करता लढत आहे. जेव्हा एखादा राजकीय पक्ष आणि काही जण या विषयाला राजकीय रंग देऊ पाहतात ते पाहून फार वाईट वाटते, असेही गोयल म्हणाले. ६ हजार १७७ मेट्रीक टन ऑक्सिजन हा कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असणाऱ्या राज्यांमध्ये पुरवला जाणार असून, सर्वाधिक पुरवठा म्हणजे दीड हजार मेट्रीक टन ऑक्सिजन महाराष्ट्राला देण्यात येणार आहे, अशी माहिती गोयल यांनी दिली. 

कुंभ किंवा रमजानमध्ये नियमांचे पालन अशक्य

कुंभमेळा किंवा रमजान यांमध्ये कोरोना नियमांचे पालन केले गेले नाही. ते होऊही शकत नाही. यामुळे त्यांना आवाहन केले आणि कुंभमेळा प्रतिकात्मकरित्या साजरा करण्यात येत आहे, असे केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. निवडणूक प्रचारसभांची वेळ कमी करण्यात आली आहे. आतापर्यंत आम्ही ५ कोटी मास्कचे वाटप केले आहे. मात्र, प्रचारसभांसंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार केवळ निवडणूक आयोगालाच आहे, असेही शाह यांनी स्पष्ट केले.
 

Web Title: piyush goyal says pm narendra modi working 18 to 19 hours in a day in corona situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.