Bullet Train India Update : बुलेट ट्रेन कधी सुरू होणार? रेल्वे मंत्री पियुष गोयलांनी दिले 'हे' उत्तर; म्हणाले...

By देवेश फडके | Published: February 8, 2021 01:32 PM2021-02-08T13:32:20+5:302021-02-08T13:34:11+5:30

गेल्या अनेक वर्षांपासून भारतात बुलेट ट्रेन धावण्यावर केवळ चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित बुलेट ट्रेन प्रत्यक्षात कधी सुरू होणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहे.

piyush goyal talked about why indian railway bullet train project delayed | Bullet Train India Update : बुलेट ट्रेन कधी सुरू होणार? रेल्वे मंत्री पियुष गोयलांनी दिले 'हे' उत्तर; म्हणाले...

Bullet Train India Update : बुलेट ट्रेन कधी सुरू होणार? रेल्वे मंत्री पियुष गोयलांनी दिले 'हे' उत्तर; म्हणाले...

Next
ठळक मुद्देबुलेट ट्रेन प्रकल्प कधी प्रत्यक्षात येणार, याबाबत पियुष गोयल यांचे भाष्यभूमिअधिग्रहण पूर्ण न झाल्यामुळे प्रकल्प खोळंबल्याची कबुलीगुजरातमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला सुरुवात

नवी दिल्ली : गेल्या अनेक वर्षांपासून भारतात बुलेट ट्रेन धावण्यावर केवळ चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित बुलेट ट्रेन प्रत्यक्षात कधी सुरू होणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना यासंदर्भात विचारले असता, त्यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाला विलंब होण्याची काही कारणे सांगितली. (Piyush Goyal talked about why Indian railway bullet train project delayed)

पियुष गोयल यांनी सांगितले की, महाराष्ट्रात भूमिअधिग्रहणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाला विलंब होत आहे. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेनचे काम पूर्णपणे ठप्प झालेले आहे. केंद्र सरकारकडून अनेकदा अधिकारी आणि मंत्री स्तरावर भूमिअधिग्रहणाबाबत चर्चा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्रातील भूमिअधिग्रहणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी, यासंबंधी निर्देश दिले आहेत. मात्र, महाराष्ट्रातील स्थिती सुधारलेली नाही. 

गुजरातमध्ये ९० टक्के भूमिअधिग्रहण पूर्ण

बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या एक तृतीयांशही जमीन महाराष्ट्रातून मिळालेली नाही. याउलट, गुजरातमध्ये ९० टक्के भूमिअधिग्रहणाचे काम पूर्ण झालेले आहे. महाराष्ट्रातील काम प्रलंबित असल्यामुळे निविदा प्रक्रियेलाही सुरुवात करता येत नाही. बुलेट ट्रेन प्रकल्पाचे टर्मिनस मुंबईत तयार होणार आहे, असे पियुष गोयल यांनी सांगितले. 

धक्कादायक! 'या' राज्यात शाळा सुरू होताच १९२ विद्यार्थी, ७२ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

कोरोना संकटाचा फटकाही काही प्रमाणात बुलेट ट्रेन प्रकल्पाला बसला आहे. दरम्यानच्या काळात गुजरातमधील काम सुरू करण्यात आले आहे. गुजरातमधील निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात अपेक्षित जमिनीचे अधिग्रहण होत नाही, तोपर्यंत बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत ठोस सांगू शकत नाही. यानंतरच अंतिम नियोजनाला सुरुवात होऊ शकते. 

Web Title: piyush goyal talked about why indian railway bullet train project delayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.