रेल्वेच्या डब्यामध्येही पिझ्झा आणि बर्गर

By admin | Published: June 29, 2016 06:06 AM2016-06-29T06:06:39+5:302016-06-29T06:06:39+5:30

यापुढे प्रवाशांना रेल्वेच्या वेबसाईटवर त्यांच्या आवडीच्या बर्गर आणि पिझ्झांची आॅर्डर देता येईल

Pizza and burgers in the train carriage | रेल्वेच्या डब्यामध्येही पिझ्झा आणि बर्गर

रेल्वेच्या डब्यामध्येही पिझ्झा आणि बर्गर

Next


बेंगळुरू : यापुढे प्रवाशांना रेल्वेच्या वेबसाईटवर त्यांच्या आवडीच्या बर्गर आणि पिझ्झांची आॅर्डर देता येईल. प्रवाशांना तो डब्यात आणून दिला जाईल. पिझ्झा, बर्गरची हुक्की आल्यास पैसे मोजताच प्लॅटफॉर्मवरचा वेंडर बॉय तो त्यांच्या हातावर ठेवेल.
क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट (क्यूएसआर) म्हणून प्रसिद्ध असलेला डोमिनो पिझ्झा, बर्गर किंग, सबवे, केएफसी आणि पिझ्झा हट आता रेल्वेस्थानकांवर दुकाने उघडत रेल्वे प्रवाशांना भुरळ घालणार आहेत. भारतीय रेल्वे सुमारे १२ हजार रेल्वेगाड्या चालवत असून दररोज २.३ कोटी प्रवासी करतात. त्यामुळेच या कंपन्यांनी या मोठ्या बाजारपेठेवर नजर ठेवत नव्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. हावडा, मुंबई, मदुराई, आग्रा, पुणे आणि विशाखापट्टणमसारख्या स्थानकांवर दिसणारी ही दुकाने (फूड कोर्ट) रेल्वेकडून विकल्या जाणाऱ्या अन्नामध्ये मोठे स्थित्यंतर घडवून आणेल असे मानले जाते. (वृत्तसंस्था)
>२०० कोटींची गुंतवणूक
प्रवासी अन्न सेवेतील के. हॉस्पिटॅलिटी कॉर्पने येत्या दोन-तीन वर्षांमध्ये विमानतळ आणि रेल्वेस्थानकांवरील फूड कोर्टसाठी २०० कोटींच्या गुंतवणुकीची योजना आखली आहे. तिथे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ब्रॅन्डचे पिझ्झा, बर्गर, तसेच लेबानीज पदार्थ मिळतील, याशिवाय तेथे उत्तर भारतीय डिशेस आणि करीही मिळू शकेल.
तीन मिनिटांत पिझ्झा :डोमिनो पिझ्झाने गॅसवर चालणाऱ्या ओव्हनच्या आधारे तीन मिनिटांत पिझ्झा देण्याची तयारी चालविली असून त्यात पिझ्झाची चव किंवा आकाराशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सबवे या कंपनीने पहिल्यांदाच चार इंचीच्या सँडवीचचा समावेश केला आहे.
आमचे पुणे रेल्वेस्थानकावर स्टोअर उघडले जात असून प्रवाशांची आवड जपत आम्ही योग्य सेवा देणार आहोत.
-रणजीत तलवार, सबवे प्रमुख, भारत

Web Title: Pizza and burgers in the train carriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.