पीजे रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर रक्षा खडसे: अजिंठापर्यंत सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2016 12:10 AM2016-01-22T00:10:20+5:302016-01-22T00:10:20+5:30
जळगाव :पाचोरा- जामनेर पीजे रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचे प्रयत्न सुरू असून या संदर्भात रेल्वे मंत्र्यालयाकडून सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली.
ज गाव :पाचोरा- जामनेर पीजे रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचे प्रयत्न सुरू असून या संदर्भात रेल्वे मंत्र्यालयाकडून सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली. पाचोर्याहून जामनेरला सिंगल लाईन पीजे रेल्वे गेल्या अनेक दिवसांपासून धावते. शेकडो प्रवासी या छोट्या गाडीने रोज प्रवास करीत असतात. प्रवाशांना ही सुविधा अधिक चांगल्या प्रकार मिळावी यासाठी या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याशी चर्चा झाली असून दोन महिन्यात या संदर्भातील सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे. हा मार्ग अजिंठा बोदवडपर्यंत व्हावा असेही प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगीतले. -----इन्फो...जळगाव मुक्ताईनगर सहा पदरीजळगाव ते मुक्ताईनगर या मार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ असते. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही या मार्गावर जास्त आहे. ही बाब लक्षात घेऊन संभावित चौपदरीकणाच्या निविदेत जळगाव ते मुक्ताईनगर या मार्गावर सहा पदरी रस्ता करण्याचे प्रस्तावित आहे. चिखली ते फागणे या रस्त्याचे टेंडर येत्या आडवड्यात निघेल असेही त्यांनी सांगितले.