काँग्रेसची रणनीती ‘पीके’ ठरविणार?

By admin | Published: January 20, 2016 03:24 AM2016-01-20T03:24:28+5:302016-01-20T03:24:28+5:30

लोकसभा निवडणुकीत मोदींचे मास्टर राजकीय स्ट्रॅटेजिस्ट, बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार, लालूप्रसाद, काँग्रेस महाआघाडीच्या विजयाचे शिल्पकार

PK will decide Congress's strategy? | काँग्रेसची रणनीती ‘पीके’ ठरविणार?

काँग्रेसची रणनीती ‘पीके’ ठरविणार?

Next

सुरेश भटेवरा,  नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीत मोदींचे मास्टर राजकीय स्ट्रॅटेजिस्ट, बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार, लालूप्रसाद, काँग्रेस महाआघाडीच्या विजयाचे शिल्पकार, प्रशांत किशोर उर्फ पीके पुढल्या वर्षीच्या पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचार मोहिमेचे सारथ्य करणार आहेत. पंजाबमधे सत्ताधारी अकाली दल भाजप युती खेरीज ‘आप’चे अस्तित्वही लक्षणीय असल्याने काँग्रेसची रणनीती ठरवतांना पीकेंचा सामना यंदा एके (अरविंद केजरीवाल) यांच्याशीही होणार आहे.
अकाली दल भाजप युतीकडून मात खाल्ल्यामुळे पंजाबमध्ये काँग्रेस गेल्या ९ वर्षांपासून सत्तेबाहेर आहे. राज्याची सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेस यंदा कोणतीही चूक करू इच्छित नाही. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींची प्रशांत किशोर यांच्याशी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात भेट झाली. त्यानंतर लगेच कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या आगामी रणनीतीची सूत्रे ठरवण्यासाठी प्रशांत किशोर यांची मदत घेण्याचे ठरवले. सध्या प्रशांत किशोर यांनी आपली टीम पंजाबच्या राजकीय स्थितीचे प्राथमिक अवलोकन करण्यासाठी रवाना केली आहे.
पंजाबमधे तरूण मतदारांची संख्या जवळपास ५0 टक्के आहे. त्यासाठी सोशल मीडियावर काँग्रेसचा प्रभाव वाढवण्याचे प्रयत्न अमरिंदर सिंग यांनी अगोदरच सुरू केले आहेत. जोडीला विविध शैक्षणिक संस्था व महाविद्यालयांमधे तरूण वर्गाशी थेट संवाद साधण्याचा अमरिंदर सिंग यांचा जुना उपक्रमही सुरू आहेच. अरूण जेटलींचा पराभव करतांना याच प्रयोगाचा अवलंब अमरिंदर सिंग यांनी केला होता.
समविचारी पक्षांची साथ मिळवण्यासाठीही काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचे पुतणे व राज्याचे माजी अर्थमंत्री मनप्रित बादल यांनी आपला पंजाब पीपल्स पार्टी हा पक्ष काँग्रेसमधे नुकताच विलिन केला.पंजाबमधे केजरीवाल व अकाली दलाशी झुंज देउन काँग्रेसला विजयी करण्यात पीके यशस्वी ठरले तर राजकीय स्ट्रॅटेजीच्या क्षेत्रात त्यांची उंची अधिकच वाढणार आहे, याची त्यांना जाणीव असल्याचे या सूत्रांनी सांगितले.

Web Title: PK will decide Congress's strategy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.