'या' ठिकाणी 50 मिनिटांत खा तीन पराठे अन् मिळवा आयुष्यभर मोफत !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2017 06:20 PM2017-11-09T18:20:48+5:302017-11-09T19:22:58+5:30

येथील एका हॉटेलमध्ये सर्वात मोठा पराठा मिळतो. त्या पराठ्याचा आकार 1 फूट सहा इंच आहे आणि एक किलो वजन आहे. 

In this place, take three Parathas in 50 minutes and Free for life! | 'या' ठिकाणी 50 मिनिटांत खा तीन पराठे अन् मिळवा आयुष्यभर मोफत !

'या' ठिकाणी 50 मिनिटांत खा तीन पराठे अन् मिळवा आयुष्यभर मोफत !

Next
ठळक मुद्दे50 मिनिटांत खा तीन पराठे अन् मिळवा आयुष्यभर मोफतपराठ्याचा आकार 1 फूट सहा इंच आणि एक किलो वजनपराठे बनविण्यासाठी तुपाचा वापर

नवी दिल्ली : भारतात असा कोण नसेल की त्याला पराठे आवडणार नाहीत. सकाळच्या नाश्ताची सुरुवातच काहींची पराठे खाऊन होते. पराठा असा खाद्यपदार्थ आहे की, सकाळच्या नाश्तापासून ते रात्रीपर्यंत केव्हाही खाल्ला जाऊ शकतो. त्यामुळे भुकेची काळजी मिटते. पराठ्याचे नाव जरी काढले, तर अनेकांच्या जिभेला पाणी सुटते. पराठ्याचे अनेक प्रकार आहेत. दरम्यान, येथील एका हॉटेलमध्ये सर्वात मोठा पराठा मिळतो. त्या पराठ्याचा आकार 1 फूट सहा इंच आहे आणि एक किलो वजन आहे. 

50 मिनिटांत खा तीन पराठे अन् मिळवा आयुष्यभर मोफत
दिल्ली-रोहतक बायपासजवळ एक हॉटेल आहे. या हॉटेलचे नाव तपस्या पराठा जंक्शन असे आहे. या हॉटेलमध्ये रोज हजारो लोक नाश्ता करण्यासाठी येतात. विशेष म्हणजे, 50 मिनिटांत 3 पराठे तुम्ही येथील हॉटेलमध्ये खाल्ले, तर तुम्हाला आयुष्यभर पराठे मोफत मिळणार आहेत. त्यामुळे अनेक पराठाप्रेमी हे चॅलेंज स्वीकारण्यासाठी इकडे धाव घेतात. मात्र एक पराठा खाल्यानंतर हार मानतात. दरम्यान, या हॉटेलची चर्चा सोशल मिडीयात होत आहे.  

पराठे बनविण्यासाठी तुपाचा वापर
या हॉटेलमध्ये पराठे बनविण्यासाठी तेलाचा वापर करण्यात येत नाही, तर तुपाचा वापर केला जातो. या हॉटेलला जवळपास दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. या ठिकाणी अनेक प्रकारचे पराठे मिळतात. पनीर, स्वीट, छोला, मटर, पालक अशा प्रकारचे अनेक प्रसिद्ध पराठे आहेत. 

Web Title: In this place, take three Parathas in 50 minutes and Free for life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न