योजना व तिचे स्वरुप
By admin | Published: April 5, 2016 12:14 AM2016-04-05T00:14:20+5:302016-04-05T00:14:20+5:30
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन
Next
इ दिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या ४० ते ६५ वर्षांखालील वयोगटातील विधवा, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेंतर्गत निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र ठरतात. इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतनदारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या अपंग लाभार्थ्यांपैकी फक्त १८ ते ६५ वषार्खालील वयोगटातील ८० टक्क्यांपेक्षा जास्त अपंग असलेले किंवा एक किंवा एका पेक्षा जास्त अपंग असलेले किंवा बहू अपंग असलेले (दोन किंवा त्यापेक्षा जास्त अपंग असलेल) लाभार्थी इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेंतर्गत निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र असतात. संजय गांधी निराधार अनुदान योजना६५ वर्षांखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, अपंगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा ( आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या विधवासह ), घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, तृतीयपंथी, देवदासी, ३५ वर्षांवरील अविवाहीत स्त्री, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो. श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन१)६५ व ६५ वर्षांवरील व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव समाविष्ट असणार्या व्यक्तींना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना गट (अ) मधून ४०० रुपये प्रतिमहिना निवृत्तीवेतन देण्यात येतो. २) ज्या व्यक्तींचे ६५ व ६५ वर्षावरील आहे व ज्यांचे कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न रुपये २१ हजारच्या आत आहे, अशा वृध्दांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेंतर्गत रुपये ६०० प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन राज्य शासनाकडून देण्यात येते.राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील १८ ते ५९ वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयास एक रकमी रु.२० हजाराचे अर्थसाहाय्य देण्यात येते.इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनादारिद्र्यरेषेखालील ६५ व ६५ वर्षांवरील सर्व व्यक्ती पात्र होतील. या लाभार्थ्यांना रुपये ६०० प्रतिमहा प्रति लाभार्थी निवृत्तीवेतन