गुन्हेपीडितांना भरपाई देण्याची योजना मंजूर; २ आॅक्टोबरपासून योजनेची अंमलबजावणी करण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 04:28 AM2018-09-06T04:28:34+5:302018-09-06T04:29:29+5:30

बलात्कारासह अन्य लैंगिक अत्याचार, जिवंत जाळण्याचे प्रकार आणि अ‍ॅसिड हल्ला अशा गुन्ह्यांमधील पीडित व्यक्तींना सरकारकडून ठराविक रक्कम भरपाई म्हणून देण्याची योजना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मंजूर केली.

A plan to compensate criminals; Order to implement the scheme from Oct 2 | गुन्हेपीडितांना भरपाई देण्याची योजना मंजूर; २ आॅक्टोबरपासून योजनेची अंमलबजावणी करण्याचे आदेश

गुन्हेपीडितांना भरपाई देण्याची योजना मंजूर; २ आॅक्टोबरपासून योजनेची अंमलबजावणी करण्याचे आदेश

Next

नवी दिल्ली : बलात्कारासह अन्य लैंगिक अत्याचार, जिवंत जाळण्याचे प्रकार आणि अ‍ॅसिड हल्ला अशा गुन्ह्यांमधील पीडित व्यक्तींना सरकारकडून ठराविक रक्कम भरपाई म्हणून देण्याची योजना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मंजूर केली. याची अंमलबजावणी २ आॅक्टोबरपासून केली जावी, असा आदेशही न्यायालयाने दिला.
ही भरपाई योजना स्त्री व पुरुष अशा दोन्ही लिंगाच्या गुन्हेपीडितांना लागू होईल व त्यात दिल्या जाणाऱ्या भरपाईच्या रकमेला कोणतीही
कमाल मर्यादा असणार नाही.
सरकार भरपाई योजना व तिची नियमावली तयार करत नाही, तोपर्यंत न्यायालयाने तयार केलेली योजना लागू राहील, असेही नमूद केले गेले. दिल्लीतील निर्भया बलात्कार व हत्याकांडानंतर अशा भारपाईचा विषय घेऊन निपुण सक्सेना यांनी जनहित याचिका केली. मध्यंतरी न्यायालयाने त्यात ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांना ‘अ‍ॅमायकस क्युरी’ नेमले व राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरणास (नाल्सा) यासाठी भरपाई योजनेचा मसुदा तयार करण्यास सांगितले.
‘नाल्सा’चा मसुदा व अ‍ॅड. जयसिंग यांच्या सूचना मंजूर करून, न्या. मदन बी. लोकूर, न्या. दीपक गुप्ता व न्या. एस. अब्दुल नझीर
यांच्या खंडपीठाने भरपाई योजना मंजूर केली. अशा भरपाईसाठी प्रत्येक राज्यात स्वतंत्र निधीची स्थापना केली जाईल.

किमान भरपाई
लैंगिक अत्याचाराने मृत्यू : ५ लाख रु.
बलात्कार : ४ लाख
बलात्कारामुळे गर्भारपण : ३ लाख
सामूहिक बलात्कार ५ लाख
अनैसर्गिक लैंगिक अत्याचार : ४ लाख
हल्ल्यामुळे गर्भपात किंवा नपुंसकत्व : २ लाख
अ‍ॅसिड हल्ल्याने विद्रुपता वा मृत्यू ७ लाख
जळीतकांडात मृत्यू : ७ लाख

Web Title: A plan to compensate criminals; Order to implement the scheme from Oct 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.