दहशतवाद्यांचा हल्ला नियोजनबद्ध, पाकिस्तानचा हात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 07:22 AM2019-02-15T07:22:48+5:302019-02-15T07:25:05+5:30

जम्मू काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेला हल्ला अतिशय निंदनीय आहे. या हल्ल्याची योजना दोन ते तीन महिन्यांपासून सुरू होती. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याची शक्यता आहेच.

Planned terrorists attack, Pakistan's hand | दहशतवाद्यांचा हल्ला नियोजनबद्ध, पाकिस्तानचा हात

दहशतवाद्यांचा हल्ला नियोजनबद्ध, पाकिस्तानचा हात

Next

- दत्तात्रय शेकटकर,
लेफ्टनंट जनरल (निवृत्त)

जम्मू काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेला पुलवामा हल्ला अतिशय निंदनीय आहे. या हल्ल्याची योजना दोन ते तीन महिन्यांपासून सुरू होती. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याची शक्यता आहेच. तसेच स्थानिकांचाही यात सहभाग नक्कीच आहे. यामुळे सर्जिकल स्ट्राइक ही केवळ पाकिस्तानात करून चालणार नाही. जम्मू काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवादी तळांवरही करणे महत्त्वाचे आहे. यासाठी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य द्यायला हवे.
जम्मू काश्मीरमध्ये झालेला हल्ला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आहे. पाकिस्तानचा हात या मागे नक्कीच आहे. मात्र, हल्ल्यात वापरलेली कार ही स्थानिक नागरिकाची असल्याने स्थानिक दहशतवाद्यांचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानकडून मिळणारा पैसा आणि राजकीय हव्यासापोटी काही स्थानिक नेत्यांनीही या हल्ल्यासाठी मदत केली असेल, हे मी खात्रीने सांगू शकतो. यामुळे पाकिस्तानी दहशतवाद्यांऐवजी स्थानिक दहशतवादी आता घातक होऊ लागले आहे. त्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत अनेक जवानांनी दहशतवादी हल्ल्यात त्यांच्या प्राणांची आहुती दिली आहे. यामुळे आता अजून किती मुलींना आपण विधवा होताना पाहायचे आहे. राष्ट्राच्या सहनशक्तीची एक सीमा असते. यामुळे आता भारत सरकारने सैन्यांना अशा विरोधात थेट कारवाईचे आदेश देण्याची वेळ आली आहे. ‘हमले का जवाब हमले से’ देण्याची वेळ आली आहे. भारतीय नागरिकांच्या, जवानांच्या जीवाचे मूल्य एवढे स्वस्त नाही. दहशतवाद्यांविरोधात सर्जिकल स्ट्राइकची मागणी सातत्याने केली जाते. पाकिस्तानच्या भूमीवरून जे दहशतवादी कार्य करतात, त्यांना ठार करणे हे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच महत्त्वाचे आहे की, जम्मू काश्मीरच्या भूमिवरून भारताविरोधात कारवाई करणाऱ्या दशहतवाद्यांवरही कारवाई करणे गरजेचे आहे. यामुळे देशाने दहशतवाद्यांच्या विरोधात निर्णय घेण्याची वेळ आली आहे. यासाठी संपूर्ण राष्ट्राने एकत्र येणे गरजेचे असून सरकारला यासाठी पाठिंबा द्यायला हवा.
----------------------

अनेक दिवसांपासून अशा प्रकारचे हल्ले सुरू आहेत. त्याला चोख प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे.
- संतोष भोसले, असिस्टंट कमांडर, केंद्रीय राखीव पोलीस दल

अतिरेकी हल्ल्यासाठी संधी शोधत असतात. त्यांना प्रत्युत्तर देण्याची आवश्यकता आहे.
- बी. के. टोप्पो, निवृत्त जवान, केंद्रीय राखीव पोलीस दल

जम्मू काश्मीरमध्ये आजही अनेक फुटीरतावादी आणि दहशतवादी गट कार्यरत आहेत. दहशतवाद्यांच्या विरोधात लष्करी कारवाया करून चालणार नाही, पण नवे ‘सायकॉलॉजिकल वॉर’ आपल्याकडून होणे गरजचे आहे. यात आपण कमी पडतोय. दहशतवाद्यांना धडा शिकवणे गरजेचे आहे. पण त्यांना मारून दहशतवाद संपणार नाही. यामुळे दहशतवाद निर्माण करणाºया संस्थांनाच संपवण्याची गरज आहे. यात चीन आणि इस्त्राएलचा आदर्श घेणे गरजेचे आहे.
- बी. के. पंडित, माजी लेफ्टनंट जनरल

Web Title: Planned terrorists attack, Pakistan's hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.