भारतात हल्ल्याचे पाकमध्ये नियोजन

By admin | Published: May 13, 2017 12:04 AM2017-05-13T00:04:05+5:302017-05-13T00:04:05+5:30

पाकिस्तानात तळ असलेले दहशतवादी गट भारत आणि अफगाणिस्तानात हल्ले करण्याचे नियोजन करीत आहेत, असे अमेरिकेच्या

Planning in Pakistan attack in India | भारतात हल्ल्याचे पाकमध्ये नियोजन

भारतात हल्ल्याचे पाकमध्ये नियोजन

Next

वॉशिंग्टन : पाकिस्तानात तळ असलेले दहशतवादी गट भारत आणि अफगाणिस्तानात हल्ले करण्याचे नियोजन करीत आहेत, असे अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सचे संचालक डॅनियल कोटस् यांनी म्हटले. पाकिस्तानला अतिरेकी आणि दहशतवाद्यांना आवरण्यात अपयश आल्याचेही त्यांनी सिनेटच्या गुप्तचर निवड समितीला सांगितले. जगाला असलेल्या धोक्यांवर काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या सुनावणीत ते बोलत होते. हे दहशतवादी व अतिरेकी गट त्या भागातील अमेरिकेच्या हितसंबंधांना सततचा धोका निर्माण करतील, त्यांचे भारत आणि अफगाणिस्तानात हल्ले घडविण्याचे सतत नियोजन आहे, असे कोटस् म्हणाले.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील खालावत चाललेल्या संबंधांचा दोष अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने गुरुवारी पाकिस्तानला दिला आणि यावर्षी पाकिस्तानकडून भारतात फार मोठा दहशतवादी हल्ला झाला तर हे संबंध आणखी वाईट होतील, असा इशाराही दिला.
भारताच्या विरोधातील अतिरेक्यांना असलेला पाठिंबा रोखण्यात पाकिस्तान अपयशी ठरले आहे आणि पाकिस्तानच्या या धोरणाबद्दल भारताचा वाढत चाललेला राग, तसेच जानेवारी २०१६ मध्ये पठाणकोट हवाईतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीत होत नसलेल्या प्रगतीमुळे २०१६ मध्ये उभय देशांतील संबंध कमालीचे चिघळले, असे डॅनियल कोटस् म्हणाले.
२०१६ मध्ये भारतात सीमेपलीकडून झालेल्या दोन मोठ्या दहशतवादी हल्ल्यांनंतर त्या दोन देशांतील द्विपक्षीय संबंध अधिक चिघळल्याचे कोटस् यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
जेयूडीवर अमेरिकेचे निर्बंध-
मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद याच्या जमात उद दावा, लष्कर ए तय्यबा आदी दहशतवादी गटांवर अमेरिकेने निर्बंध लादले आहेत. या गटाचे पैसा गोळा करण्याचे जाळे आणि नेतृत्वाला उधळून लावण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून हे निर्बंध आहेत.
लष्कर ए तय्यबाचा धर्मादाय कार्यक्रमांचा चेहरा असलेल्या तालिबान, जमात उल दावा अल कुराण, इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सीरिया आणि इसिस खोरासन यांच्यावर हे निर्बंध लादण्यात आले आहेत.

Web Title: Planning in Pakistan attack in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.