१०० टक्के कचरा उचलण्याचे नियोजन मनपा: आयुक्तांनी घेतला आरोग्यचा आढावा

By admin | Published: July 12, 2016 12:10 AM2016-07-12T00:10:11+5:302016-07-12T00:10:11+5:30

जळगाव: मनपा आयुक्त जीवन सोनवणे यांनी सोमवारी आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली. त्यात शहरातील दररोज निर्माण होणारा १०० टक्के कचरा त्याच दिवशी उचलला जाण्याच्यादृष्टीने नियोजनाच्या सूचना दिल्या. दोन दिवसांत याबाबतचा अहवाल मागविला असून महिनाभरात त्यादृष्टीने अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती मनपा आयुक्तांनी दिली.

Planning to take 100 percent waste: Municipal Commissioner's review of health | १०० टक्के कचरा उचलण्याचे नियोजन मनपा: आयुक्तांनी घेतला आरोग्यचा आढावा

१०० टक्के कचरा उचलण्याचे नियोजन मनपा: आयुक्तांनी घेतला आरोग्यचा आढावा

Next
गाव: मनपा आयुक्त जीवन सोनवणे यांनी सोमवारी आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली. त्यात शहरातील दररोज निर्माण होणारा १०० टक्के कचरा त्याच दिवशी उचलला जाण्याच्यादृष्टीने नियोजनाच्या सूचना दिल्या. दोन दिवसांत याबाबतचा अहवाल मागविला असून महिनाभरात त्यादृष्टीने अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती मनपा आयुक्तांनी दिली.
शहरात साफसफाईबाबत ओरड होत आहे. मात्र मनपाचे कोट्यवधी रूपये खर्च होऊनही शहरात कचर्‍याचे ढीग कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने कचरा सड्ल्याने दुर्गंधी पसरून साथीचे आजार पसरण्याची भीती आहे. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त सोनवणे यांनी आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली. त्यात शासनाच्या निर्देशानुसार दररोज निर्माण होणारा १०० टक्के कचरा त्याच दिवशी उचलला जावा यादृष्टीने किती वाहने, मनुष्यबळाची गरज आहे? याबाबत अहवाल देण्याची सूचना आरोग्याधिकार्‍यांना केली आहे. दोन दिवसांत याबाबत नियोजन करून अहवाल मागविला आहे. मनपाचा नवीन वाहने खरेदीचा प्रस्तावही अंतिम टप्प्यात असून त्यातून नवीन वाहने खरेदी केली जातील. त्यामुळे महिनाभरात १०० टक्के कचरा दररोज उचलला जाण्याच्यादृष्टीने अंमलबजावणी सुरू होईल, असे सांगितले.

Web Title: Planning to take 100 percent waste: Municipal Commissioner's review of health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.