योजनांचा गावनिहाय आराखडा करणार

By admin | Published: September 26, 2014 11:15 PM2014-09-26T23:15:27+5:302014-09-26T23:15:27+5:30

सीईओ काकाणी: सर्व अधिकार्‍यांनी सोमवार आणि शुक्रवारी मुख्यालयात रहावे

Plans for village planning | योजनांचा गावनिहाय आराखडा करणार

योजनांचा गावनिहाय आराखडा करणार

Next
त, दुबार आणि स्थलांतरित मतदारांची नावे वगळल्याचा दावा
नाशिक : जिल्‘ात निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार विशेष मोहिमेअंतर्गत दोन लाख ४३ हजार ६२० मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी विलास पाटील यांनी दिली. विशेष म्हणजे, वगळलेल्या मतदारांमध्ये सर्वाधिक दोन लाख एक हजार ४६१ मतदार स्थलांतरित झाल्याने त्यांची नावे वगळल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील तिसर्‍या टप्प्यातील प्रचार आटोेपला. त्यासंदर्भात विलास पाटील यांनी २४ एप्रिलच्या मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाल्याचे सांगत, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात आल्याचे सांगितले. निवडणूक कर्मचारी व अधिकार्‍यांना दहा हजारांचे आगाऊ मानधन देण्यात आले असून, त्यात त्यांना जेवण, प्रवास व अन्य आवश्यक त्या बाबींसाठी खर्च करण्यास मुभा देण्यात आली आहे. गेल्या दीड वर्षापासून निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार यादी स्वच्छ करण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत जिल्‘ातील दोन लाख ४३ हजार ६२० मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. त्यात २३ हजार १४ मतदार मयत, दोन लाख एक हजार ४६१ स्थलांतरित तसेच १८ हजार ५९३ मतदारांची नावे दुबार असल्याने ही सर्व नावे वगळण्यात आली आहेत. मात्र मूळ यादीत नाव असेल आणि सुधारित मतदार यादीत नाव नसल्यास अशा मतदारांची नावे प्रिंटर एरर (छपाई चूक) म्हणून पुन्हा सहभागी करण्यात येतील. मात्र नव्याने कोणत्याही मतदारांचा समावेश मतदार यादीत करण्यात येणार नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे ५५२ मतदार अक्षरश: मतदार यादीतून गायब झाले आहेत. त्यांची नावे असूनही हे मतदार सापडत नाहीत. मागील वर्षी फोटो असलेली ८० टक्के मतदारसंख्या आता ९५ टक्क्यांच्या आसपास आहे. २४ तारखेला मतदानाच्या दिवशी व एक दिवस अगोदर एक विशेष पथक मतदारांच्या मदतीसाठी व त्यांची नावे मतदार यादीत शोधून देण्यासाठी कार्यरत राहणार आहे. यावेळी पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, उपआयुक्त संदीप दिवाण, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गीतांजली बाविस्कर, जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर मुराळकर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Plans for village planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.