ओळख लपवण्यासाठी नीरव करणार होता प्लॅस्टिक सर्जरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 06:57 AM2019-03-22T06:57:10+5:302019-03-22T06:57:52+5:30

तब्बल १५ महिन्यांनंतर लंडनमध्ये अटक करण्यात आलेला नीरव मोदी स्वत:ची ओळख लपवण्यासाठी प्लॅस्टिक सर्जरी करणार होता.

 Plastic surgery was going to be defenseless to hide the identity | ओळख लपवण्यासाठी नीरव करणार होता प्लॅस्टिक सर्जरी

ओळख लपवण्यासाठी नीरव करणार होता प्लॅस्टिक सर्जरी

googlenewsNext

मुंबई : तब्बल १५ महिन्यांनंतर लंडनमध्ये अटक करण्यात आलेला नीरव मोदी स्वत:ची ओळख लपवण्यासाठी प्लॅस्टिक सर्जरी करणार होता़ अटक टाळण्यासाठी तो चेहरा बदलणार होता, अशी माहिती समोर आली आहे़
पंजाब नॅशनल बँकेत १४ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा मोदीवर आरोप आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात मोदी भारतातून पळून गेला़ त्याने अनेक देशांत आश्रय घेतला़ आॅस्ट्रेलियापासून १,७५० किमी अंतरावरील वनाटू या देशाचे नागरिकत्व मिळविण्यासाठीही मोदीने प्रयत्न केले़ मात्र त्यात त्याला यश आले नाही.
बँक घोटाळ्याप्रकरणी मुंबईतील विशेष न्यायालयात मोदी व त्याच्या कुटुंबाविरोधात आरोपपत्र दाखल झाले़ त्याला हजर करण्यासाठी विशेष न्यायालयाने नोटीसही बजावली़ त्यानुसार तपास यंत्रणांनी लंडनमधील कोर्टाकडे मोदीच्या अटकेची विनंती केली़ त्याची दखल घेत लंडन कोर्टाने तशी नोटीस जारी केली़ त्यानंतर मोदीला लंडनमध्ये अटक झाली़

Web Title:  Plastic surgery was going to be defenseless to hide the identity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.