प्लॅटिनम, हिऱ्यांचे दागिने गिफ्ट म्हणून देण्याचे तरुणांमध्ये आकर्षण वाढले, चांगल्या परताव्यामुळे श्रीमंतांचे गुंतवणुकीसाठी प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 06:28 IST2025-03-31T06:27:26+5:302025-03-31T06:28:34+5:30

Investment News: देशात विशेषतः श्रीमंतांमध्ये आणि तरुणांमध्ये प्लॅटिनम आणि हिऱ्यांचे दागिने भेटवस्तू म्हणून देण्याचा ट्रेंड वाढला आहे. गुंतवणुकीसाठीही आता या पर्यायांचा विचार होत आहे.

Platinum and diamond jewelry has become increasingly popular among young people as a gift, making it a preferred investment for the wealthy due to its guaranteed and consistently good returns. | प्लॅटिनम, हिऱ्यांचे दागिने गिफ्ट म्हणून देण्याचे तरुणांमध्ये आकर्षण वाढले, चांगल्या परताव्यामुळे श्रीमंतांचे गुंतवणुकीसाठी प्राधान्य

प्लॅटिनम, हिऱ्यांचे दागिने गिफ्ट म्हणून देण्याचे तरुणांमध्ये आकर्षण वाढले, चांगल्या परताव्यामुळे श्रीमंतांचे गुंतवणुकीसाठी प्राधान्य

नवी दिल्ली - देशात विशेषतः श्रीमंतांमध्ये आणि तरुणांमध्ये प्लॅटिनम आणि हिऱ्यांचे दागिने भेटवस्तू म्हणून देण्याचा ट्रेंड वाढला आहे. गुंतवणुकीसाठीही आता या पर्यायांचा विचार होत आहे.
प्लॅटिनमचा उपयोग दागिन्यांखेरीज वाहनांसह इतर उद्योगांमध्येही होतो. बाजार संशोधन आणि सल्लागार कंपनी ग्रँड व्ह्यू रिसर्चनुसार, भारतातील प्लॅटिनम दागिन्यांच्या बाजारातील उलाढाल २०२४ मध्ये ७,५०० कोटी रुपये इतकी होती. ही उलाढाल २०३० पर्यंत २० हजार कोटी रुपयांचा टप्पा पार करेल, असा अंदाज आहे. 

प्लॅटिनमची मागणी वाढली
भारतात प्लॅटिनमच्या दागिन्यांची मागणी २० टक्क्यांनी वाढत आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात सीमा शुल्कात कपात झाल्यानंतर २०२४ च्या प्लॅटिनम दागिन्यांच्या मागणीत १८ टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

हिरे बाजार १७ अब्ज डॉलरपर्यंत वाढणार
हिऱ्यांच्या दागिन्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. गुंतवणुकीसाठीही हिऱ्यांचा पर्याय देशात आधीपासून लोकप्रिय आहेच.
वाढती मागणी लक्षात घेता देशातील हिऱ्यांच्या दागिन्यांची उलाढाल २०३१ पर्यंत १७ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. 

श्रीमंतांमध्ये मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणुकीस प्राधान्य दिले जाते. प्लॅटिनम सोन्याच्या तुलनेत दुर्मिळ आहे. तरुण पिढी आंतरराष्ट्रीय फॅशन ट्रेंड्सबद्दल सजग आहे. तरुणांमध्ये प्लॅटिनम, हिऱ्यांच्या लोकप्रिय होत आहेत. - सिमरन शाह, उपाध्यक्ष विक्री, कामा ज्वेलरी 

हिन्यांच्या भेटवस्तूंना प्रतिष्ठा असते. हिन्ऱ्यांनी चांगलाच परतावा दिलेला आहे. गुंतवणुकीचा शेअर बाजारातील पडझडीशी संबंध नसतो.  - अमित प्रतिहारी, व्यवस्थापकीय संचालक, डी बीयर्स इंडिया

Web Title: Platinum and diamond jewelry has become increasingly popular among young people as a gift, making it a preferred investment for the wealthy due to its guaranteed and consistently good returns.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.