अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी स्वामींची सर्वोच्च न्यायालयात याचिका

By admin | Published: February 22, 2016 12:54 PM2016-02-22T12:54:14+5:302016-02-22T12:54:14+5:30

भाजप नेते सुब्रहमण्यम स्वामी यांनी अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्यात यावं यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे

Plea in Supreme Court to build Ram temple in Ayodhya | अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी स्वामींची सर्वोच्च न्यायालयात याचिका

अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी स्वामींची सर्वोच्च न्यायालयात याचिका

Next
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 22 - भाजप नेते सुब्रहमण्यम स्वामी यांनी अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्यात यावं यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार सुब्रहमण्यम स्वामी यांनी याचिकेत 'मुस्लिम देशांत सार्वजनिक उद्धेशासाठी एखादं बांधकाम करायचं असेल तर मशीद दुस-या जागी हलवली जाते मात्र मंदिर एकदा बांधल तर त्याला पुन्हा हात लावला जात नाही' असा उल्लेख केला आहे. 
'अयोध्येतील वादग्रस्त मशीद सरयू नदीच्या पलीकडे दुस-या जागी हलवली जाऊ शकते. आणि त्याठिकाणी राम मंदिर उभारल जाऊ शकत' असं सुब्रहमण्यम स्वामी यांनी म्हणले आहे. न्यायालयाने राम मंदिर - बाबरी मशीदसंबंधी याचिकांवर सुनावणी करणा-या खंडपीठाकडे ही याचिका पाठवत असल्याचं सांगितल आहे. 

Web Title: Plea in Supreme Court to build Ram temple in Ayodhya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.