प्लीज ‘नोट’ : आजपासून नोटांसाठी पुन्हा नवे नियम!

By admin | Published: November 18, 2016 07:03 AM2016-11-18T07:03:29+5:302016-11-18T07:03:29+5:30

हजार-पाचशेच्या जुन्या नोटा बंद करण्याच्या निर्णयांतर आलेल्या नवनव्या नियमांनी सर्वसामान्य जनता अगोदरच संभ्रमात असताना आता

Please note: Now again the new rules for the notes! | प्लीज ‘नोट’ : आजपासून नोटांसाठी पुन्हा नवे नियम!

प्लीज ‘नोट’ : आजपासून नोटांसाठी पुन्हा नवे नियम!

Next

नवी दिल्ली : हजार-पाचशेच्या जुन्या नोटा बंद करण्याच्या निर्णयांतर आलेल्या नवनव्या नियमांनी सर्वसामान्य जनता अगोदरच संभ्रमात असताना आता गुरुवारी केंद्र सरकारने आणखीन भर घातली आहे. त्यामुळे व्यवहार सुरळीत सुरू ठेवणे सर्वांनाच अवघड होत आहे.
बँकेतून ४५00 हजार रुपयांच्या नोटा बदलून मिळवताना लोकांचे हाल होत असले आणि तेवढी रक्कम आठवडाभर पुरत नसली तरी आता बँकेतून केवळ २ हजार रुपयेच दिले जातील, असे जाहीर करण्यात आले. १८ नोव्हेंबरपासून हा नियम लागू होणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी दिली. मात्र शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाच्या रकमेतून आठवड्याला २५ हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आली आहे आणि पीक विम्याचा हप्ता भरण्याची मुदत १५ दिवसांनी वाढवून दिली आहे.
यापूर्वी प्रत्येक व्यक्तीला बँकेतून ४,५०० रुपयांपर्यंतच्या नोटा बदलून मिळतील, असे सरकारने सांगितले होते. प्रत्यक्षात काही बँका ४ हजार तर काही बँका २ हजार रुपयेच ग्राहकांना देत होत्या. ही रक्कम आता २ हजार रुपयेच करण्यात आली आहे. अधिकाधिक लोकांना नोटा
बदलता याव्यात हाच यामागील उद्देश
आहे, असे कारण अर्थ सचिवांनी पुढे केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 कृषी उत्पन्न बाजारपेठेतील नोंदणीकृत व्यापारी आणि अडते यांना आठवड्यातून एकदा आपल्या खात्यातून ५0 हजार रुपये काढता येतील.
रब्बीच्या पेरण्यांसाठी शेतकऱ्यांना खते, औषधे आदींची खरेदी करता यावी, यासाठी त्यांना कर्ज खात्यातून आठवड्यातून २५ हजार रुपये काढता येतील.
 कृषी उत्पादन बाजारात विकल्याने आरटीजीएसने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणाऱ्या रकमेतून दर आठवड्याला २५ हजार रुपये शेतकऱ्यांना काढता येतील.

Web Title: Please note: Now again the new rules for the notes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.