तामिळनाडूत निवडणुकांच्या निमित्ताने आश्वासनांची खैरात, सोलर कूकर, घर मोफत अन् शैक्षणिक कर्जही माफ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 04:39 AM2021-03-18T04:39:38+5:302021-03-18T04:40:13+5:30

 अण्णा द्रमुकने वॉशिंग मशिन, सोलर कुकर मोफत देण्याबरोबरच प्रत्येकाला घर बांधून देण्याची घोषणा  केली आहे. घरातील किमान एका व्यक्तीला सरकारी नोकरी मिळेल आणि शैक्षणिक कर्जाची रक्कम माफ केली जाईल, असे पक्षाने जाहीरनाम्यात म्हटले आहे. 

Pledges On the occasion of elections in Tamil Nadu, solar cookers, free housing and education loans waived | तामिळनाडूत निवडणुकांच्या निमित्ताने आश्वासनांची खैरात, सोलर कूकर, घर मोफत अन् शैक्षणिक कर्जही माफ

तामिळनाडूत निवडणुकांच्या निमित्ताने आश्वासनांची खैरात, सोलर कूकर, घर मोफत अन् शैक्षणिक कर्जही माफ

googlenewsNext

चेन्नई : तामिळनाडूतील जनतेच्या घरात गेल्या १५ वर्षांत झालेल्या विधानसभा निवडणुकांमुळे काही ना काही वस्तू मोफत मिळाल्या आहे. त्या कमी आहेत की काय, म्हणून यंदा पुन्हा अण्णा द्रमुक व द्रमुक या दोन पक्षांनी अशा आणखी आश्वासनांची सध्या खैरात चालवली आहे. (Pledges On the occasion of elections in Tamil Nadu, solar cookers, free housing and education loans waived)

 अण्णा द्रमुकने वॉशिंग मशिन, सोलर कुकर मोफत देण्याबरोबरच प्रत्येकाला घर बांधून देण्याची घोषणा  केली आहे. घरातील किमान एका व्यक्तीला सरकारी नोकरी मिळेल आणि शैक्षणिक कर्जाची रक्कम माफ केली जाईल, असे पक्षाने जाहीरनाम्यात म्हटले आहे. 

 त्यामुळे द्रमुकनेही शैक्षणिकच नव्हे, तर अन्य काही कर्जेही माफ करण्याची घोषणा केली आहे. नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना ७५ टक्के आरक्षण आणि कोविडचा रुग्ण आढळला, त्या कुटुंबाला ४ हजार रुपये मदत देण्याचे घोषित केले आहे. हे सारे करण्यासाठी निधी कोठून आणणार, याचे उत्तर ते देत नाहीत. तामिळनाडूला सर्वाधिक महसूल दारूतून मिळतो. तरीही दारूबंदी करू, अशी घोषणा दोन्ही पक्ष करीत आहेत. 



 या आधीच्या निवडणुकांत रंगीत टीव्ही संच, लॅपटॉप, मोबाइल, मंगळसूत्र, दुभती गाय, मिक्सर, ग्राइंडर अशी आश्वासने या दोन्ही पक्षांनी जनतेला दिली. मुख्य म्हणजे ती पूर्ण केली. त्यामुळे राज्यावर कर्जाचा बोजा वाढला. पण वस्तू मोफत मिळत असल्याने लोक खूश झाले. यंदाही निवडणुकांनंतर  अनेकांच्या घरात काही ना काही वस्तू आपोआप येणार आहेत. 


ग्राइंडर, मिक्सरवर प्रेम
- तामिळनाडूतील जनतेला अन्य वस्तूंपेक्षा मिक्सर व ग्राइंडर या वस्तू हव्या असतात. इडली, डोसा यांचे पीठ ग्राइंडरमध्ये तयार करता येते.

- चटण्या मिक्सरमध्ये करता येतात. अन्यथा त्यासाठी रगडा व पाटा वरवंटा लागतो.

Web Title: Pledges On the occasion of elections in Tamil Nadu, solar cookers, free housing and education loans waived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.