पश्चिम बंगालचे अनेक तुकडे करण्याचा डाव, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 07:29 AM2022-11-11T07:29:22+5:302022-11-11T07:29:46+5:30
उत्तर बंगालला पश्चिम बंगाल राज्यापासून वेगळे करण्यासाठी बिहार आणि आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून बंदुकांची तस्करी होत असल्याचा आरोप
कोलकाता :
उत्तर बंगालला पश्चिम बंगाल राज्यापासून वेगळे करण्यासाठी बिहार आणि आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून बंदुकांची तस्करी होत असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी केला. ममता म्हणाल्या, यासाठी व्हीआयपी वाहनांचा वापर केला जात आहे. काही लोक डिसेंबरपासून राज्यात जातीय हिंसाचार भडकवण्याची योजना आखत आहेत यासाठी षडयंत्र रचले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तुम्ही लालची असाल तर...
- जर तुम्ही लालची असाल आणि पैसे कमावत असाल तर यामुळे तुमची समाजात बदनामी होते. भाजप देशात सर्वांत भ्रष्ट पक्ष असून,
- भाजप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतो. प्रत्येक निवडणुकीत ते हजारो कोटी रुपये खर्च करतात. तो पैसा कुठून येतो?
- हिमाचल प्रदेश आणि गुजरात निवडणुकीसाठी पुन्हा बाँड उघडण्यात आले आहेत. संस्थांचा वापर विरोधकांना घाबरविण्यासाठी केला जात आहे, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.