सायरस मिस्त्री मागणार पंतप्रधान मोदींकडे दाद ?

By admin | Published: October 26, 2016 11:05 AM2016-10-26T11:05:59+5:302016-10-26T12:39:05+5:30

टाटा उद्योग समूहाच्या चेअरमन पदावरून तडकाफडकी दूर करण्यात आल्यानंतर सायरस मिस्त्री आता याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे दाद मागण्याची शक्यता आहे

PM to ask Cyrus Mistry? | सायरस मिस्त्री मागणार पंतप्रधान मोदींकडे दाद ?

सायरस मिस्त्री मागणार पंतप्रधान मोदींकडे दाद ?

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - १00 अब्ज डॉलरच्या टाटा उद्योग समूहाच्या चेअरमन पदावरून तडकाफडकी दूर करण्यात आल्यानंतर सायरस मिस्त्री आता याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे दाद मागण्याची शक्यता असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. मोठ्या उमेदीनं ज्याच्या हाती देशातील अवाढव्य अन् शिस्तप्रिय उद्योगसमूहाची कमान काही महिन्यांपूर्वी दिली गेली त्या टाटा समूहाच्या अध्यक्ष सायरस मिस्त्री यांना सोमवारी अचानक समूहानेच ‘टाटा’ केला. 
 
(सायरस मिस्त्री देणार होते रतन टाटांचा बळी)
 
चेअरमनपदी नियुक्ती झाल्यानंतर सायरस मिस्त्री राजकीय संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. रतन टाटांचे वारसदार म्हणून आपली छाप पाडण्यासाठी तसंच ग्रुपमध्ये आपलं पद राखून ठेवण्यासाठी हा प्रयत्न केला जात होता अशी चर्चा आहे. आपल्या याच संबंधांचा फायदा घेत सायरस मिस्त्री लढाई लढण्याची शक्यता आहे. 
 
(सायरस मिस्त्रींनी टाटांविरोधात केल्या कॅव्हेट दाखल)
(टाटा समूहाचे चेअरमनपद पुन्हा रतन टाटांकडे)
(सायरस मिस्त्रींना ‘टाटा’)
 
सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हटवल्याप्रकरणी न्यायालयात जाण्याचा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे शापूरजी पालनजी कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, टाटा सन्सने मात्र या प्रकरणी न्यायालयीन लढाईची पूर्ण तयारी केलेली दिसते. कंपनीच्या वतीने मंगळवारी सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयात आणि राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे कॅव्हेट दाखल करण्यात आले.
 
(कायदेशीर लढाईसाठी टाटा सन्सकडून हरीश साळवे, अभिषेक मनू सिंघवीची टीम ?)
(कंपन्यांचे बाजारमूल्य वाढवूनही सायरस मिस्त्रींना 'टाटा')
 
४८ वर्षीय मिस्त्री यांनी चार वर्षांपूर्वी ७८ वर्षीय रतन टाटा यांच्याकडूनच ‘टाटा सन्स’ या ‘टाटा समूहा’च्या होल्डिंग कंपनीच्या चेअरमनपदाचा कार्यभार स्वीकारला होता. मिस्त्री यांना पदावरून तातडीने काढण्यामागील कारण जाहीर करण्यात आलेले नाही. तथापि, मिस्त्री यांच्या कामावर ‘टाटा सन्स’ समाधानी नव्हती. नफ्यात नसलेल्या उद्योगांकडे त्यांचे लक्ष नव्हते, असे समजते. मिस्त्री यांना पदमुक्त केल्याची माहिती रतन टाटा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे कळवली आहे. ‘टाटा’ला स्थैर्य देण्यासाठी सध्या पद स्वीकारल्याचे ते म्हणाले. 
 
 04/07/1968 रोजी जन्मलेल्या सायरस मिस्त्री यांनी लंडनमधील इंपेरियल कॉलेज आॅफ सायन्स, टेक्नॉलॉजी आणि मेडिसिनमध्ये सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी प्राप्त केलेली आहे. त्यानंतर त्यांनी लंडन बिझनेस स्कूलमध्ये एमबीए केले. पण, टाटा समूहाला पुढे नेण्यात ते कमी पडले, असे बोलले जात आहे. नोव्हेंबर 2011मध्ये सायरस मिस्त्री यांची टाटांचे वारसदार म्हणून डेप्युटी चेअरमनपदी नेमणूक करण्यात आली होती.
 

Web Title: PM to ask Cyrus Mistry?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.