PM Kisan: शेतकऱ्यांसाठी खूशखबर! पीएम किसान योजनेचा 10 वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 05:11 PM2021-12-23T17:11:38+5:302021-12-23T17:12:21+5:30

PM Kisan Samman Nidhi 2021 Latest News : 1 जानेवारीला पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.

PM Kisan 10th installment coming on January 1: Here's the direct link to check your name on beneficiary list | PM Kisan: शेतकऱ्यांसाठी खूशखबर! पीएम किसान योजनेचा 10 वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार 

PM Kisan: शेतकऱ्यांसाठी खूशखबर! पीएम किसान योजनेचा 10 वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार 

googlenewsNext

नवी दिल्ली : शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पीएम किसान योजनेंतर्गत मिळणाऱ्या  10व्या हप्त्याची शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. पीएम किसान सन्मान निधी 2021 योजनेचा (PM Kisan Samman Nidhi 2021) हप्ता जारी करण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्याचा मेसेजही लाभार्थ्यांना पाठवण्यात आला आहे. 1 जानेवारीला पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.

शेतकऱ्यांना पाठवलेल्या मेसेजमध्ये दिलेल्या माहितीनुसार, पीएम मोदी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारी 2022 रोजी दुपारी 12 वाजता पीएम किसान योजनेअंतर्गत 10 वा हप्ता जारी करतील. या दिवशी पीएम मोदी शेतकरी उत्पादक संघटनांना इक्विटी अनुदानही जारी करतील, अशीही माहिती या मेसेजमध्ये देण्यात आली आहे. शेतकरी pmindiawebcast.nic.in किंवा दूरदर्शनच्या माध्यमातून या कार्यक्रमात सामील होऊ शकतात.

दरम्यान, पीएम किसान योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत केंद्र सरकारने 11.17 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली आहे. हे पैसे तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करते. पहला हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्चदरम्यान करण्यात येतो, तर दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान आणि तिसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो.

आतापर्यंत शेतकऱ्यांना 9 हफ्ते मिळाले आहेत
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतंर्गत केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आतापर्यंत 9 हफ्ते दिले आहेत. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. दहाव्या हप्त्यासोबतच नवव्या हप्त्याचे पैसे न मिळालेल्या शेतकऱ्यांनाही दोन हफ्त्याची रक्कम मिळेल. त्यामुळे या शेतकऱ्यांना एकूण चार हजार रुपये मिळणार आहेत. 

योजनेचे लाभार्थी असाल तर असे करा तुमचे नाव चेक
पीएम किसान योजनेसाठी शेतकरी ऑनलाईन अर्ज (नोंदणी) करू शकतात. यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी किंवा त्यामध्ये काही बदल करण्यासाठी पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवरून करता येणार आहे. यासाठी प्रथम www.pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. वेबसाइटच्या होम पेजवर, फार्मर्स कॉर्नर उजव्या बाजूला मोठ्या अक्षरे लिहिलेले आहे. आपले नाव सूचीमध्ये आहे की नाही हे आपण पाहू इच्छित असल्यास आपल्याला लाभार्थी यादी / Beneficiary list वर क्लिक करावे लागेल. यानंतर आपण आपले नाव राज्य, जिल्हा, उपजिल्हा, गट आणि गाव यांचे नाव भरून तपासू शकता.

Web Title: PM Kisan 10th installment coming on January 1: Here's the direct link to check your name on beneficiary list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.