PM Kisan: खूशखबर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले २० हजार कोटी रुपये, चेक करा बॅलन्स, पैसे न आल्यास इथे करा तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 13:20 IST2022-01-01T13:19:17+5:302022-01-01T13:20:38+5:30
PM Kisan Samman Nidhi : पंतप्रधान Narendra Modi यांनी आज नववर्षाच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांना भेट दिली आहे. पंतप्रधानांनी पीएम किसान सन्मान निधीच्या दहाव्या हप्ताची रक्कम जमा केली आहे.

PM Kisan: खूशखबर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले २० हजार कोटी रुपये, चेक करा बॅलन्स, पैसे न आल्यास इथे करा तक्रार
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नववर्षाच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांना भेट दिली आहे. पंतप्रधानांनी पीएम किसान सन्मान निधीच्या दहाव्या हप्ताची रक्कम जमा केली आहे. यांतर्गत केंद्र सरकारने १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा केली आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र सरकारकडून प्रत्येकी सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. यामध्ये दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा हप्ता दिला जातो. पीएम किसान पोर्टलनुसार या स्कीमचा पहिला हप्ता १ डिसेंबरपासून ३१ मार्चदरम्यान पाठवला जातो. तर दुसरा हप्ता १ एप्रिल ते ३१ जुलैदरम्यान शेतकऱ्यांच्या खात्ताय पाठवले जातात. तर तिसरा हप्ता हा १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबरदरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवला जातो.
पीएम किसान सन्मान योजनेचे पैसे न आल्यास करा तक्रार
पीएम किसान टोल फ्री नंबर: 18001155266
पीएम किसान हेल्पलाईन नंबर: 155261
पीएम किसान हेल्पलाईन नंबर: 011—23381092, 23382401
पीएम किसान योजनेची नवी हेल्पलाईन: 011-24300606
ई-मेल आयडी: pmkisan-ict@gov.in