PM Kisan Scheme : मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणार गिफ्ट, उद्या खात्यात पाठवले जाणार 19000 कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 02:55 PM2021-05-13T14:55:31+5:302021-05-13T15:03:55+5:30
PM Kisan Scheme : 14 मे रोजी 11 वाजता ही ही रक्कम पाठवली जाणार असल्याची माहिती स्वत: केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी दिली आहे.
नवी दिल्ली : देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी कोरोनाच्या संकटात खुशखबर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यावेळीही पीएम किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi scheme) आठवा हप्ता देणार आहेत. 14 मे रोजी 11 वाजता ही ही रक्कम पाठवली जाणार असल्याची माहिती स्वत: केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ही रक्कम हस्तांतरित करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. (pm kisan nidhi scheme 8th installment pm modi will transfer to 9.5 crore farmers account check details)
यासंदर्भात केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ट्विट केले आहे. "पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 14 मो 2020 रोजी सकाळी PM Kisan योजनेअंतर्गत 9.5 कोटी शेतकऱ्यांना आठव्या हप्त्याच्या स्वरुपात 19000 कोटींची रक्कम डीबीटीच्या माध्यमातून हस्तांतरित करतील", असे नरेंद्र सिंह तोमर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच, या लाइव्ह इव्हेंटची लिंक देखील नरेंद्र सिंह तोमर यांनी या ट्वीटमध्ये शेअर केली आहे. pmevents.ncog.gov.in लाईव्ह कार्यक्रमासाठी तुम्ही या लिंकला भेट देऊ शकता. हे पैसे डीबीटीच्या (Direct Benefit Transfer) माध्यमातून अर्थात थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जाणार आहे.
प्रधानमंत्री श्री @narendramodi जी, 14 मई 2021 प्रातः 11:00 बजे #PMKisan योजना के तहत देश के 9.5 करोड़ किसानों के खातों में 8वीं किस्त के तौर पर रु. 19,000 करोड़ की राशि DBT के माध्यम से हस्तांतरित करेंगे...
— Narendra Singh Tomar (@nstomar) May 13, 2021
इस इवेंट से लाइव जुड़ने के लिए रजिस्टर करें : https://t.co/8IRCLWb674pic.twitter.com/EtuyV09Fmf
दरम्यान, पीएम किसान सन्मान निधी योजना देशातील गरीब शेतकऱ्यांना (Farmers) बी-बियाणे, खते खरेदी करण्याकरता निधी मिळावा म्हणून राबवली जात आहे. मोदी सरकार कडून (Modi Government)पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वर्षाला देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. 2000 रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांना पाठवले जातात.
केंद्रीय कृषी मंत्रालयानुसार, पीएम किसान सन्मान निधी योजनाचा आठवा हप्ता (PM Kisan 8th installment) शेतकऱ्यांच्या खात्यात वळता करण्याची तारीख ठरली आहे. आधी आलेल्या वृत्तानुसार, राज्य सरकारांनी RFT (Request For Transfer) Sign केले आहे. तसेच केंद्र सरकारनेही FTO (Fund Transfer Order) काढली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये RFT Signed by State For 8th Installment असा स्टेटस दिसत आहे. PMkisan.gov.in वर जाऊन तुम्ही तुमच्या खात्यामध्ये लॉगिन करून हे तपासू शकणार आहात.
कसे चेक कराल?
- PMkisan.gov.in वर लॉगिन करा...
- तिथे 'Farmers Corner' मिळणार आहे.
-'Farmers Corner' मध्ये 'Beneficiary List' हा ऑप्शन मिळणार आहे.
- 'Beneficiary List' च्या बटनावर क्लिक करा...
- या पेजवर राज्य, जिल्हा, उप जिल्हा, ब्लॉक निवडा. यानंतर तुमचा गाव निवडा.
- यानंतर 'Get Report' वर क्लिक करा. यामध्ये लाभार्थ्यांची संपूर्ण यादी येणार आहे.
- महत्वाचे म्हणजे ही लिस्ट आद्याक्षरानुसार असते. तसेच एकापेक्षा जास्त पानांची असते.