PM Kisan Tractor Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्वाची योजना! ट्रॅक्टर घ्या निम्म्या किंमतीत; केंद्राची सबसिडी कशी मिळवायची?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 08:59 PM2022-02-21T20:59:35+5:302022-02-21T21:02:01+5:30
Tractor on subsidy: लक्षात असुद्या एका शेतकऱ्याला एकाच ट्रॅक्टरसाठी अनुदान दिले जाते. ट्रॅक्टरचा नांगरणीपासून ते माल वाहतूकीसाठी याचा मोठा वापर होतो. शिवाय तो भाड्याने दिल्याने चांगले उत्पन्न देखील मिळते.
मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि उत्पादन वाढविण्यासाठी अनेक योजना लाँच केल्या आहेत. शेतीसाठी सर्वात महत्वाचा म्हणजे आता ट्रॅक्टर ठरू लागला आहे. नांगरणीपासून ते माल वाहतूकीसाठी याचा मोठा वापर होतो. शिवाय तो भाड्याने दिल्याने चांगले उत्पन्न देखील मिळते. शेतकऱ्याला जर हा ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर केंद्र सरकार त्यासाठी मोठी सबसिडी देत आहे. ही सबसिडी 'पीएम किसान ट्रॅक्टर योजना' (PM Kisan Tractor Yojana) या नावाने दिली जात आहे. याविषयी जाणून घेऊया...
शेतीसाठी ट्रॅक्टर अत्यंत आवश्यक आहे. पण देशात असे अनेक शेतकरी आहेत ज्यांच्याकडे आर्थिक परिस्थितीमुळे ट्रॅक्टर नाही. अशा परिस्थितीत त्यांना ट्रॅक्टर भाड्याने आणणे किंवा बैलांचा वापर करावा लागतो. या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने ही योजना आणली आहे. पीएम किसान ट्रॅक्टर योजनेअंतर्गत (PM Kisan Tractor Yojana Benefits) शेतकऱ्यांना अर्ध्या किमतीत ट्रॅक्टर दिले जातील.
केंद्र सरकार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी अनुदान (पीएम किसान ट्रॅक्टर योजना) देते. या अंतर्गत शेतकरी कोणत्याही कंपनीचे ट्रॅक्टर अर्ध्या किमतीत खरेदी करू शकतात. उर्वरित निम्मी रक्कम सरकार अनुदान म्हणून देते. याशिवाय अनेक राज्य सरकारेही त्यांच्या स्तरावर शेतकऱ्यांना ट्रॅक्टरवर २० ते ५० टक्के सबसिडी देतात.
लक्षात असुद्या एका शेतकऱ्याला एकाच ट्रॅक्टरसाठी अनुदान दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, जमिनीचे कागद, बँक तपशील, पासपोर्ट आकाराचा फोटो आदी असणे आवश्यक आहे. या योजनेसाठी शेतकरी जवळच्या CSC केंद्राला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.