आजचा अंदाज चुकला! पीएम किसान योजनेचे पैसे बँकेत आले नाहीत; जाणून घ्या कधी मिळणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 08:57 PM2021-12-16T20:57:37+5:302021-12-16T20:57:45+5:30

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले नाही, त्यांचा पुढील हप्ता थांबू शकतो.

PM Kisan Yojana money did not reach in the bank; Find out when will it come | आजचा अंदाज चुकला! पीएम किसान योजनेचे पैसे बँकेत आले नाहीत; जाणून घ्या कधी मिळणार...

आजचा अंदाज चुकला! पीएम किसान योजनेचे पैसे बँकेत आले नाहीत; जाणून घ्या कधी मिळणार...

googlenewsNext

नवी दिल्ली: 'प्रधानमंत्री किसान योजने'चा (PM Kisan Yojana) 10वा हप्ता आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणे अपेक्षित होते. पण, अद्याप याबाबत कोणतेही अपडेट आलेले नाही. योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना यासाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते. आता पुढील आठवड्यात PM किसान(PM Kisan Samman Nidhi 10th Installment) चा दहावा हप्ता येईल असा अंदाज आहे.

पीएम मोदींच्या कार्यक्रमांमुळे चर्चा सुरू

गतवर्षी शेतकऱ्यांना तिसरा हप्ता 25 डिसेंबर रोजी देण्यात आला होता. यावेळी 15 डिसेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार असल्याचे विविध बातम्यांमधून सांगण्यात येत होते. यानंतर 16 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या एका कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती समोर आल्यावर 16 डिसेंबरला 10 वा हप्ता यायला सुरुवात होईल, अशी चर्चा सुरू झाली.

कार्यक्रमात पंतप्रधानांनी नैसर्गिक शेतीचे फायदे सांगितले

आजचा पंतप्रधानांचा कार्यक्रम नैसर्गिक शेतीबद्दल होता. या कार्यक्रमात गुजरातमधील सुमारे पाच हजार शेतकरी उपस्थित होते, ज्यांच्यासमोर पीएम मोदींनी नैसर्गिक शेतीचे फायदे सांगितले. संपूर्ण कार्यक्रमात पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्याचा उल्लेख नव्हता. याबाबत अधिकृतपणे काहीही सांगितले गेले नाही.

या कारणामुळे विलंब होत आहे

पुढील हप्ता मिळण्यास होणारा विलंब विनाकारण नाही. राज्यांनी RFT वर स्वाक्षरी केली आहे, परंतु निधी हस्तांतरण आदेश (FTO) अद्याप तयार झालेला नाही. एफटीओ तयार झाल्यानंतरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातात. पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवरील स्थितीमध्ये सध्या फक्त आरएफटी दिसत आहे.

eKYC अनिवार्य झाले

यावेळी सरकारने काही बदल केले आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत ई-केवायसी केलेले नाही, त्यांचा पुढील हप्ता अडकू शकतो. तुम्हीही तुमच्या खात्यात पैसे येण्याची वाट पाहत असाल, तर लगेच eKYC ची प्रक्रिया पूर्ण करा.
 

Web Title: PM Kisan Yojana money did not reach in the bank; Find out when will it come

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.