PM KISAN Yojana: शेतकऱ्यांनो बँक खाते चेक करा; मोदींकडून पीएम किसानचा 8 वा हप्ता जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 12:45 PM2021-05-14T12:45:53+5:302021-05-14T12:46:15+5:30
PM Narendra Modi releases 8th installment of PM Kissan: डिसेंबर 2018 मध्ये मोदी सरकारने ही योजना सुरु केली होती. या योजनेनुसार छोट्या शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपयांची मदत दिली जाते. या योजनेचा लाभ केवळ 2 हेक्टरपेक्षा कमी शेती असलेल्या लोकांनाच होत आहे.
PM KISAN Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सम्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) 8 वा हप्ता जारी केला आहे. यानुसार 9.5 कोटी लाभार्थ्यांना 19000 कोटी रुपये वळते करण्यात आले आहेत. थोड्याच दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये आठव्या हप्त्याचे 2000 रुपये पोहोचणार आहेत. (PM released 8th installment worth over Rs 20,000 cr to 9.5 cr farmers under PM-KISAN)
डिसेंबर 2018 मध्ये मोदी सरकारने ही योजना सुरु केली होती. या योजनेनुसार छोट्या शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपयांची मदत दिली जाते. या योजनेचा लाभ केवळ 2 हेक्टरपेक्षा कमी शेती असलेल्या लोकांनाच होणार आहे. महत्वाचे म्हणजे यावेळी पश्चिम बंगालच्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.
पैसे आले का? असे चेक करा...
पीएम किसान सम्मान निधि योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) ची अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in वर जा.
वेबसाईटच्या उजव्य़ा बाजुला Farmers Corner वर क्लिक करा.
Farmers Corner च्या खाली Beneficiary Status चा ऑप्शन दिसेल. यावर क्लिक करा.
यानंतर नवीन पेज ओपन होईल, त्यावर तुमचा आधार नंबर, बँक अकाऊंट नंबर किंवा मोबाईल नंबर चा पर्याय निवडा.
यानंतर जो पर्याय येईल त्यावर तुमही निवडलेल्या पर्यायाचा नंबर टाका. यानंतर 'Get Data' वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला सर्व हप्त्यांची माहिती मिळेल.
Amid the difficult challenges of #COVID19, farmers have made records in agriculture & gardening while Govt is also setting new records on procurement on MSP every year. In comparison to last year, 10% more wheat has been purchased on MSP this year: Prime Minister Modi pic.twitter.com/J7A8UVBxOm
— ANI (@ANI) May 14, 2021
PM Kisan वर Loan
पीएम किसाननुसार रजिस्टर असलेल्या शेतकऱ्यांना आणखी एक फायदा देऊ केला आहे. मोदी सरकार या शेतकऱ्य़ांना कमी व्याजदराने लोनही देते. आत्मनिर्भर भारत योजनेद्वारे (Atmanirbhar Bharat Yojana) हे लोन दिले जाते. सरकारने गेल्या वर्षी शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी करण्याचे आदेश दिले होते.
शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले 58 हजार कोटी...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, आतापर्यंत कोरोना संकटाच्या काळात गेल्या वर्षीच्या तुलनेत 10 टक्के जास्त गहू खरेदी केला आहे. या गव्हाचे जवळपास 58 हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठविले आहेत.