लॉकडाऊनदरम्यान पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची सुरूवात, ८० कोटी लोकांना फायदा : अर्थमंत्री

By जयदीप दाभोळकर | Published: February 1, 2021 11:24 AM2021-02-01T11:24:15+5:302021-02-01T11:25:42+5:30

Budget 2021 : लॉकडाऊनच्या कालावधीत सरकारकडून २७.१ कोटींची मदत, जी जीडीपीच्या १३ टक्के - अर्थमंत्री

PM launches poor welfare scheme during lockdown benefits 80 crore people Finance Minister nirmala sitaraman budget 2021 | लॉकडाऊनदरम्यान पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची सुरूवात, ८० कोटी लोकांना फायदा : अर्थमंत्री

लॉकडाऊनदरम्यान पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची सुरूवात, ८० कोटी लोकांना फायदा : अर्थमंत्री

Next
ठळक मुद्देलॉकडाऊनच्या कालावधीत सरकारकडून २७.१ कोटींची मदत, जी जीडीपीच्या १३ टक्के - अर्थमंत्रीपंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा ८० कोटी लोकांना फायदा

२०२१ या वर्षांचं देशाा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या काही कालावधीत आणि लॉकडाऊन दरम्यान सरकारनं केलेल्या कामगिरीची माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा अर्थसंकल्प हा वेगळा होता. यावेळी कोणत्याही कागदपत्रांशिवाय टॅबच्या सहाय्यानं हा अर्थसंकल्प मांडण्यात आला. तीन आठवड्याच्या लॉकडाऊनदरम्यान पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची सुरूवात करण्यात आली असून याचा फायदा देशातील ८० कोटी लोकांना झाल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी दिली. 

"तीन आठवड्यांच्या पूर्ण लॉकडाऊनदरम्यान पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याण योजना सुरू केली. याचा फायदा देशातील ८० कोटी लोकांना झाला. आठ कोटी लोकांना मोफत गॅस सिलिंडर मिळालं. या कालावधीत मोठ्या संख्येत लोकं आपापल्या घरात होती. असं असलं तर आरोग्य सेवक, बँक कर्मचारी, वीज कर्मचारी, आपले अन्नदाते आणि जवान कार्यरत होते," असं सीतारामन म्हणाल्या.

"या कालावधीत सदनातील सर्व सदस्यांनी ज्याप्रकारे साथ दिली त्यांचे मी आभार मानते. विधानसभा सदस्य आणि लोकसभेचे सदस्य यांनी आपलं वेतनही या महासाथीदरम्यान दिलं. या कालावधीत सरकारनं आत्मनिर्भर पॅकेज जाहीर केलं. यावेळी सरकारनं एकूण २७.१ लाख कोटी रूपये दिली जे देशाच्या जीडीपीच्या १३ टक्के आहेत," असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
ज्या प्रकारे यावेळी अर्थसंकल्प तयार केला तसा यापूर्वी कधीही करण्यात आला नाही. हे एक आव्हान होतं. गेल्या वेळी जेव्हा आम्ही अर्थसंकल्प सादर केला तेव्हा जागतिक अर्थव्यवस्था कोणत्या दिशेला जाणार हे आम्हाला माहित नव्हतं. कोणालाच ही कल्पनादेखील नव्हती की आपण एका मोठ्या महासाथीच्या दिशेने जात आहोत, असंही सीतारामन यांनी नमूद केलं. आपल्याकडे आज दोन लसी उपलब्ध आहेत. १०० पेक्षा जास्त देशांना त्याचा फायदा मिळत आहे. अजून दोन लसी लवकरच येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वैज्ञानिकांना धन्यवाद दिले. २०२१ मध्येही आपलं ये युद्ध सुरूच आहे. जागतिक युद्धानंतर जसे बदल घडले तसे कोरोनाच्या युद्धानंतर रणनितीक संबंधांमध्ये बदल होती. भारत लँड ऑफ होपकडे पाहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.  

Web Title: PM launches poor welfare scheme during lockdown benefits 80 crore people Finance Minister nirmala sitaraman budget 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.