पंतप्रधान मोदी ‘ब्रिक्स’साठी रवाना
By admin | Published: July 13, 2014 11:48 PM2014-07-13T23:48:33+5:302014-07-13T23:48:33+5:30
निरंतर आर्थिक विकास तसेच जागतिक शांतत२२ा व स्थैर्यासाठी ‘ब्रिक्स’च्या सदस्य देशांच्या सहकार्याची अपेक्षा करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी ब्राझीलला रवाना झाले़
नवी दिल्ली : निरंतर आर्थिक विकास तसेच जागतिक शांतत२२ा व स्थैर्यासाठी ‘ब्रिक्स’च्या सदस्य देशांच्या सहकार्याची अपेक्षा करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी ब्राझीलला रवाना झाले़ येथे ते १४ ते १५ जुलैदरम्यान आयोजित ‘ब्रिक्स’ (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) या पाच देशांच्या शिखर परिषदेत भाग घेतील़
जागतिक आर्थिक विकास, शांतता, स्थैर्य यांना चालना देण्यासाठी ब्रिक्सचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे भारत मानतो़ अनेक देशांची राजकीय अस्थैर्य, संघर्ष व मानवी आपत्तीतून वाटचाल सुरू असताना, अनेक देशांवर मंदीचे सावट असताना, ब्रिक्स देशांची शिखर परिषद होत आहे़ या संपूर्ण पार्श्वभूमीवर भारत या परिषदेत सहभागी होण्यास उत्सुक आहे, असे मोदींनी एका निवेदनात म्हटले आहे़
१४ ते १५ जुलैदरम्यान आयोजित होणाऱ्या शिखर या परिषदेत एक विकास बँक स्थापन करण्याच्या योजनेला अंतिम रूप देण्यासोबतच संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संघटनांमध्ये सुधारणांसाठी आवाज उठवला जाण्याची शक्यता आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)