पंतप्रधानांनी घेतली सुरक्षा समितीची बैठक
By admin | Published: September 30, 2016 05:11 AM2016-09-30T05:11:19+5:302016-09-30T05:11:19+5:30
पाकिस्तानसोबत वाढत्या तणावादरम्यान नियंत्रण रेषेवरील परिस्थितीचा आढावा घेण्याकरिता गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत वाढत्या तणावादरम्यान नियंत्रण रेषेवरील परिस्थितीचा आढावा घेण्याकरिता गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची (सीसीएस) बैठक झाली. या वेळी उरीतील हल्ला लक्षात घेता नियंत्रण रेषेशी संबंधित विविध पर्यायांवर चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये बुधवारी मध्यरात्रीपासून गुरुवारी पहाटेपर्यंत केलेल्या कारवाईची माहिती ज्येष्ठ मंत्र्यांना दिली. तसेच त्याचे काय परिणाम होण्याची शक्यता आहे, याचाही त्या बैठकीत आढावा घेण्यात आला,
असे सांगण्यात आले. ज्येष्ठ मंत्र्यांखेरीज मोदी यांच्या मंत्रिमंडळातील अन्य सहकाऱ्यांना या कारवाईची पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. तसेच आजच्या बैठकीतही त्यांचा सहभाग असणे अपेक्षित नव्हते.