VivaTech : ...तर कोरोना विरोधातील आमची लढाई कमकुवत पडली असती - पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 05:49 PM2021-06-16T17:49:33+5:302021-06-16T17:50:16+5:30
VivaTech 2021 मध्ये भाषण देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना विशेष आतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी VivaTech (वीवाटेक)च्या कार्यक्रमाला संबोधित केले. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी व्हिडिओ काँफरन्सिंगच्या माध्यमाने सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी कोरोना महामारी तसेच यामुळे जगाला कशा प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागले, अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.
VivaTech 2021 मध्ये भाषण देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना विशेष आतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, हे व्यासपीठ फ्रान्सच्या तांत्रिक गोष्टी दर्शवते. भारत आणि फ्रान्स व्यापक विषयांवर एकत्रितपणे काम करत आहेत. यापैकी तंत्रज्ञान आणि डिजिटल सहकार्य विकसित होणारे क्षेत्र आहेत आणि ही काळाची गरज आहे.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, मी जगाला प्रतिभा, बाजार, वित्त, इकोसिस्टम आणि ओपन मार्केटची संस्कृती, या पाच स्तंभांच्या आधारावर गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित करतो. भारतात 775 मिलियन इंटरनेट युझर्स आहेत. हे अनेक देशांच्या लोकसंख्येपेक्षाही अधिक आहेत. जगात सर्वाधिक आणि सर्वात स्वस्त डेटा देणाऱ्या देशांत भारत पहिल्या स्थानावर आहे.
कोरोनावर भाष्य करताना मोदी म्हणाले, भारतात कोरोना महामारी आली, तेव्हा आमच्याकडे पुरेशी टेस्ट क्षमता, मास्क, पीपीई किट आणि अशा इतर काही उपकरणांची कमतरता होती. मात्र, आमच्या खासगी श्रेत्राने ही कमतरता दूर करण्यात अत्यंत मोलाची भूमिका बजावली. तसेच, जर आम्ही इनोव्हेशन केले नसते, तर कोरोना विरोधातील आमची लढाई कमकुवत पडली असती. या युद्धात आपल्याला ढिलाईने काम करून चालणार नाही. म्हमजे, भविष्यात पुन्हा संकट आले, तर आपण आणखी चांगल्या पद्धतीने तयार असू.
भाजपमध्ये जोरदार इनकमिंग; आणखी एक बडा नेता हाती कमळ घेऊन सुरू करणार नवी इनिंग
VivaTech हा युरोपातील सर्वात मोठ्या डिजिटल आणि स्टार्टअप कार्यक्रमांपैकी एक आहे. हा कार्यक्रम 2016 पासून दरवर्षी पॅरिस येथे आयोजित केला जातो. या वर्षी हा कार्यक्रम 16 ते 19 जून 2021 दरम्यान आयोजित करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाच्या मुख्य वक्त्यांमध्ये फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन, स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज आणि युरोपातील विविध देशांचे मंत्री/खासदार सामील होते. या कार्यक्रमात टिम कुक, (सीईओ अॅप्पल) मार्क झुकरबर्ग (सीईओ फेसबुक) आणि ब्रॅड स्मिथ, (अध्यक्ष, मायक्रोसॉफ्ट) सारख्या इतर दिग्गजांचीही भागीदारी असेल.