"चीनवर बोलायचं होतं, बोलले 'चन्या'वर, ईदही विसरले" पंतप्रधान मोदींवर ओवेसींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 08:14 PM2020-06-30T20:14:48+5:302020-06-30T20:21:35+5:30
आजच्या आपल्या संबोधनात मोदी चीन मुद्द्यावरही बोलतील, असा कयास लावला जात होता. मात्र, त्यांनी आपल्या भाषणात चीनचा उल्लेखच केला नाही. यामुळे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एआयएमआयएम) खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मोदींवर निशाना साधला आहे
हैदराबाद -पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला संबोधित केले. या संबोधनात त्यांचा भर कोरोना व्हायरस आणि लॉकडाउनवर होता. मात्र, आजच्या आपल्या संबोधनात मोदी चीन मुद्द्यावरही बोलतील, असा कयास लावला जात होता. मात्र, त्यांनी आपल्या भाषणात चीनचा उल्लेखच केला नाही. यामुळे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एआयएमआयएम) खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मोदींवर निशाना साधला आहे. आज चीनवर बोलायचे होते, बोलले चन्यावर, असे ओवेसींनी म्हटले आहे.
टि्वटर हॅन्डलवर पीएमओ इंडियाला टॅग करत असदुद्दीन ओवेसी यांनी लिहिले, "आज चीनवर बोलायचे होते, बोलले चन्यावर. खरे तर, याची आवश्यकताही होती. कारण आपल्या अनियोजित लॉकडाउनने अनेक लोकांना भूकेले सोडले." उत्सवांवरूनही ओवेसींनी पंतप्रधानांवर निशाना साधला. ओवेसी म्हणाले,"आपण आगामी महिन्यात येणाऱ्या अनेक उत्सवांची नावं घेतली, मात्र, बकरी ईद विसरले. चला, तरीही आपल्याला ईद मुबारक," असे ओवेसींनी म्हटले आहे.
.@PMOIndia aaj China par bolna tha, bol gaye CHANA par. Which was also necessary since your unplanned lockdown had left many working people without food.
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) June 30, 2020
Also noticed that you listed many festivals in coming months but missed Baqr Eid? Chaliye, phir bhi aapko peshgi Eid Mubarak
काँग्रेसची टीका -
पंतप्रधान मोदी यांच्या आजच्या संबोधनावरून, काँग्रेसनेही मोदींवर हल्ला केला आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवर ट्विट करण्यात आले आहे, की मोदींकडून चीनची निंदा करणे तर दूरची गोष्ट, मोदी चीनच्या मुद्द्यावर देशवासियांसोबत बोलायलाही घाबरतात.
राहुल गांधींनी शायरान्या अंदाजात साधला निशाणा -
पंतप्रधानांच्या संबोधनानंतर लगेचच राहुल गांधी यांनी ट्विट करत शायरान्या अंदाजात मोदींवर निशाणा साधला. ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी लिहिले, "तू इधर उधर की न बात कर, ये बता कि काफिला कैसे लुटा, मुझे रहजनों से गिला तो है, पर तेरी रहबरी का सवाल है."
महत्त्वाच्या बातम्या -
भारताकडे आहे 'अग्नीबाण', काही मिनिटांत बेचिराख होऊ शकतो चीन; 'ही' मोठी शहरं येतात थेट निशाण्यावर!
अॅप्सनंतर चीनला आणखी एक हादरा देण्याच्या तयारीत सरकार? 'या' मोठ्या कंपनीला बसू शकतो 'जोर का झटका'!
RSS, भाजपा नेत्यांची बैठक, चीन मुद्द्यावर सरकारला मदत करणार संघ
India China Tension : चीनचा सामना करण्यासाठी 'भीष्म' मैदानात, 'ही' आहे 'खासियत'