PM मोदींच्या प्रयत्नांना यश; GE एरोस्पेसचा HAL सोबत करार, भारतात बनणार जेटचे इंजिन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 05:10 PM2023-06-22T17:10:02+5:302023-06-22T17:35:15+5:30

आता भारतात फायटर जेटचे इंजिन बनणार आहे. अमेरिकेच्या GE एअरोस्पेसे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडसोबत करार केला आहे.

PM Modi America Visit: Success to PM Modi's efforts; GE Aerospace signs deal with HAL to make jet engines in India | PM मोदींच्या प्रयत्नांना यश; GE एरोस्पेसचा HAL सोबत करार, भारतात बनणार जेटचे इंजिन

PM मोदींच्या प्रयत्नांना यश; GE एरोस्पेसचा HAL सोबत करार, भारतात बनणार जेटचे इंजिन

googlenewsNext

PM Modi America Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दरम्यान, अमेरिकेतील जीई एरोस्पेस(GE Airospace) आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) यांच्यात महत्त्वपूर्ण करार झाला आहे. या अंतर्गत जीई एरोस्पेस, एचएएलच्या सहकार्याने भारतीय हवाई दलासाठी (IAF) लढाऊ जेट इंजिन बनवणार आहे. पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना हा करार झाला आहे. या करारामुळे दोन्ही देशांमधील संरक्षण क्षेत्राला गती मिळणार आहे.

GE एरोस्पेसने सांगितले की, या करारांतर्गत भारतात GE एरोस्पेसच्या F414 इंजिनचे उत्पादन होईल. सध्या GE एरोस्पेस यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अमेरिकन सरकारसोबत काम करत आहे. हा करार भारतीय हवाई दलाच्या लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट MK2 साठी करण्यात आला आहे. 

GE के अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एच. लॉरेंस कल्प जूनियर म्हणाले की, हा भारत आणि HAL सोबतचा आमचा ऐतिहासिक करार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांमधील जवळचा समन्वय वाढवण्यात जी भूमिका बजावली आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे. आमची F414 इंजिने अतिशय मजबूत आहेत आणि दोन्ही देशांसाठी महत्त्वपूर्ण ठरतील.

GE भारतात कधीपासून कार्यरत आहे?
जीई एरोस्पेस भारतात 4 दशकांहून अधिक काळापासून कार्यरत आहे. पण, आतापर्यंत GE एरोस्पेस भारतात एव्हियोनिक्स,  इंजीनिअरिंग, उत्पादन आणि स्थानिक सोर्सिंग क्षेत्रात काम करत होता. पण, आता F414 इंजिन बनवण्याचे काम केले जाणार आहे.

भारताच्या संरक्षण क्षेत्रात GE चे योगदान 
GE एरोस्पेसने F404 इंजिनसह हलके लढाऊ विमान (LCA) विकसित करण्यासाठी 1986 मध्ये भारतातील एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी आणि HAL सोबत काम करण्यास सुरुवात केली. F404 आणि F414 हे GE एरोस्पेसच्या LCA Mk1 आणि LCA Mk2 कार्यक्रमांच्या विकास आणि उत्पादन कार्यक्रमांचा भाग होते. GE ने आतापर्यंत एकूण 75 F404 इंजिने दिली आहेत. LCA Mk1A साठी 99 इंजिने मिळणार आहेत.

Web Title: PM Modi America Visit: Success to PM Modi's efforts; GE Aerospace signs deal with HAL to make jet engines in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.