नरेंद्र मोदी व राज्यपालांना ममता बॅनर्जींची अर्धा तास वाट पाहावी लागली, बैठकीत पोहोचल्या उशिरा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 05:06 PM2021-05-28T17:06:43+5:302021-05-28T17:18:11+5:30
mamata banerjee : सरकारी सूत्रांनी दावा केला आहे की, पंतप्रधान आणि राज्यपाल यांनी आढावा बैठकीत बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित राहणार असल्यामुळे त्यांची 30 मिनिटे वाट पाहिली.
कोलकाता : दोन दिवसांपू्र्वी यास चक्रीवादळामुळे (Cyclone Yaas) झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)शुक्रवारी पश्चिम बंगालमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी एका आढावा बैठकीत भाग घेतला. पण, या बैठकीत नरेंद्र मोदी आणि राज्यपाल जगदीप धनखड यांना सुमारे 30 मिनिटे वाट पाहावी लागली. सरकारी सूत्रांनी दावा केला आहे की, पंतप्रधान आणि राज्यपाल यांनी आढावा बैठकीत बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित राहणार असल्यामुळे त्यांची 30 मिनिटे वाट पाहिली. (pm modi and governor dhankhar waited for 30 mins for bengal cm mamata banerjee to attend review meeting)
या घटनेसंदर्भात पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी ट्वीट केले की, संघर्षाची ही प्रवृत्ती राज्य किंवा लोकशाहीच्या हिताची नाही. मुख्यमंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी सहभाग न घेणे घटनात्मकता किंवा कायद्याच्या नियमांला धरून नाही. दुसरीकडे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे म्हणणे आहे की, त्यांनी दिघाला जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्याविषयी माहिती दिली होती.
2000 रुपयांच्या नोटांबद्दल मोठी बातमी #ReserveBankofIndia
— Lokmat (@MiLOKMAT) May 28, 2021
https://t.co/K5fdpCMslH
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, हिंगलगंज आणि सागर येथे आढावा बैठक घेतल्यानंतर मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कालैकुंडा येथे भेटले आणि त्यांना पश्चिम बंगालमधील चक्रीवादळानंतरच्या परिस्थितीविषयी माहिती दिली. माहितीसाठी त्यांना आपत्ती अहवाल सादर करण्यात आला आहे. आता दिघामधील मदत व जीर्णोद्धार कामांचा आढावा घेण्यासाठी पुढे जात आहे, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
दरम्यान, यास वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी आज बंगाल आणि ओडिशा येथे पोहोचले. यानंतर त्यांनी राज्य सरकारांशी आढावा बैठक घेतली. परंतु बंगालमधील आढावा बैठकीत भाजपा नेते शुभेंदु अधिकारी यांना मिळालेल्या आमंत्रणावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, ममता बॅनर्जी या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, असे आधीच सांगण्यात आले होते.