Coronavirus: …म्हणजे २० लाख कोटी नव्हे तर १४ लाख कोटी पॅकेजची होणार नवीन घोषणा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 08:41 AM2020-05-13T08:41:41+5:302020-05-13T08:45:37+5:30

Coronavirus: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आर्थिक पॅकेजची घोषणा केली पण या पॅकेजमध्ये अर्थमंत्री आणि आरबीआयकडून याआधी केलेल्या घोषणाही समाविष्ट आहेत

PM Modi Announces Rs 20 lakh crore relief package but 6 lakh crore already announced nearly pnm | Coronavirus: …म्हणजे २० लाख कोटी नव्हे तर १४ लाख कोटी पॅकेजची होणार नवीन घोषणा!

Coronavirus: …म्हणजे २० लाख कोटी नव्हे तर १४ लाख कोटी पॅकेजची होणार नवीन घोषणा!

googlenewsNext
ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केलीतत्पूर्वी ६ लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा यापूर्वीच झाली आहेउर्वरित १४ लाख कोटींबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारमण घोषणा करतील

नवी दिल्ली – कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. स्वावलंबी भारत असं या पॅकेजला नाव देण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाचा सामना करण्यासाठी घोषित केलेले २० लाख कोटी रुपये हे आतापर्यंतचं सर्वात मोठं आर्थिक पॅकेज आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आर्थिक पॅकेजची घोषणा केली पण या पॅकेजमध्ये अर्थमंत्री आणि आरबीआयकडून याआधी केलेल्या घोषणाही समाविष्ट आहेत. त्यामुळे उर्वरित पॅकेज किती कोटींचे असेल याची उत्सुकता सर्वांना आहे. आतापर्यंत रिझर्व्ह बँकेने दोन टप्प्यात सुमारे ४.२५ लाख कोटी रुपयांचे आर्थिक मदत पॅकेज जाहीर केले आहे. पहिल्यांदा २७ मार्च रोजी रिझर्व्ह बँकेने रोख वाढीसाठी अनेक उपायांची घोषणा केली आणि रेपो दरात ७५ बेसिस पॉईंटने मोठी कपात करण्याची घोषणा केली. सीआरआर ४ वरून ३ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला.

पहिले टार्गेटेड लाँग टर्म रेपो ऑपरेशन (TLTRO) द्वारे प्रणालीमध्ये १ लाख कोटींचा रोख प्रवाहाबद्दल सांगितलं होतं. यात सुमारे ३.७४ लाख कोटी रुपयांची रोकड यंत्रणेत येईल असं म्हणाले. १७ एप्रिल रोजी रिझर्व्ह बँकेने पुन्हा ५० हजार कोटींचा रोख प्रवाह वाढवण्यासाठी उपाययोजना केल्या. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही १.७ लाख रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केली होती, ज्यात गरीब कल्याण योजनेंतर्गत गरिबांना मदत केल्याचे सांगण्यात आले.

अशाप्रकारे ५.९४ लाख कोटी म्हणजे जवळपास ६ लाख कोटी आर्थिक पॅकेजची घोषणा यापूर्वीच केली आहे. पहिल्यांदा केलेल्या आर्थिक पॅकेजची मदत पुढील प्रमाणे आहे.

१) गरीब कल्याण योजना पॅकेज

केंद्र सरकारने गरीब कल्याण योजनेंतर्गत १.७ लाख कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले. त्याअंतर्गत थेट गरिबांच्या खात्यावर पैसे पाठविले जात आहेत.

२) टीएलटीआरओ १

२७ मार्च रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. रिझर्व्ह बँकेने सीआरआरमध्ये कपात केली होती आणि पहिल्या टार्गेटेड लाँग टर्म रेपो ऑपरेशन (टीएलटीआरओ) जाहीर केले होते, ज्यात प्रणालीत ३.७४ लाख कोटी रुपयांची रोकड आणली जात असल्याचे सांगितले जात होते.

रिव्हर्स रेपो दरात २५ बेस पॉईंटने कपात केली आहे. आता रिव्हर्स रेपो दर ४% वरुन ३.७५% पर्यंत खाली आला आहे. रिव्हर्स रेपो दर कपातीचा फायदा बँकांना होईल. बँकांना कर्ज मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने टीएलटीआरओ १ अन्वये बँकिंग प्रणालीत १ लाख कोटी रुपयांची रोख रक्कम जमा करण्याची घोषणा केली होती.

यानंतर १७ एप्रिल रोजी रिझर्व्ह बँकेने पुन्हा अनेक घोषणा केल्या. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, कोविड १९ मुळे छोट्या आणि मध्यम कॉर्पोरेट्सना मोठ्या प्रमाणात रोकडचा सामना करावा लागत असल्याने  टार्गेटेड लॉँगटर्म रेपो ऑपरेशन (टीएलटीआरओ २.०) जाहीर केले गेले. ग्रामीण भागातील कर्ज आणि एनबीएफसी इत्यादींसाठी नाबार्ड, सिडबी, एनएचबीची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. कोविड १९ च्या संकटामुळे या संस्थांना मार्केटमधून कर्ज मिळणे अवघड आहे, म्हणून नाबार्ड, एसआयडीबीआय, एनएचबी यांना ५० हजार कोटींची अतिरिक्त पुनर्वित्त सुविधा दिली जात आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

२० लाख कोटींमध्ये शून्य किती?; अनुपम खेर यांनी सांगितलं गणित तर अर्थमंत्र्यांचीही झाली चूक

...तर आपण विश्वासार्ह जागतिक शक्ती बनू; मोदींच्या महापॅकेजचं उद्योगजगताकडून कौतुक

स्वावलंबी भारताचा निर्धार, २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज;  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

भारतावर थेट हल्ला करा,  पाकव्याप्त काश्मीरच्या पंतप्रधानांचे इम्रान खान यांना आवाहन

केंद्राने राज्यांना दिले ६१९५ कोटी रुपये, महाराष्ट्र मात्र अन्याय

Web Title: PM Modi Announces Rs 20 lakh crore relief package but 6 lakh crore already announced nearly pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.