Coronavirus : PM-CARES फंडसाठी सढळ हाताने मदत करा, पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 09:28 PM2020-03-28T21:28:11+5:302020-03-28T21:47:39+5:30
'देशातील जनतेला मी आवाहन करतो, की त्यांनी पुढे येऊन PM-CARES फंडमध्ये आपले योगदान द्यावे. याचा उपयोग भविष्यातही, अशाच प्रकारची स्थिती निर्माण झाली, तर करता येऊ शकतो,' असे मोदी यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. आतापर्यंत कोरोनाने जगभरात हजारो लोकांचे बळी घेतले आहेत. तर लाखो लोकांना त्याची लागण झाली आहे. आपल्या देशातही कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनीही अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. आता याच पार्श्वभूमीवर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी PM-CARES फंडच्या माध्यमातून देशातील जनतेला मदतीचे आवाहन केले आहे.
'देशातील जनतेला मी आवाहन करतो, की त्यांनी पुढे येऊन PM-CARES फंडमध्ये आपले योगदान द्यावे. याचा उपयोग भविष्यातही, अशाच प्रकारची स्थिती निर्माण झाली, तर करता येऊ शकतो,' असे ट्विट करत पंतप्रधान मोदींनी, PM-CARES फंडच्या अकाउंट संदर्भातील महत्वाची माहितीही पोस्ट केली आहे.
The PM-CARES Fund accepts micro-donations too. It will strengthen disaster management capacities and encourage research on protecting citizens.
— Narendra Modi (@narendramodi) March 28, 2020
Let us leave no stone unturned to make India healthier and more prosperous for our future generations. pic.twitter.com/BVm7q19R52
PM-CARES फंडच्या माध्यमातून मायक्रो डोनेशनही स्वीकारले जाईल. आपले हो डोनेशन आपत्ती व्यवस्थापन क्षमता बळकट करेल आणि नागरिकांच्या संरक्षणावरील संशोधनास प्रोत्सहित करेल. आपल्या भवी पिढ्यांसाठी निरोगी आणि अधिक समृद्ध भारत बनवण्यासठी कसलीही कसर सोडू नका, असेही पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील नागरिकांना केलेल्या या आवाहनानंतर. अनेक जण मदतीसाठी पुढे येत आहेत. सामान्य नागरिकही आपापल्या परिने PM-CARES फंडसाठी योगदान देत आहे.