ठरलं ! मोदींच्या होकारानंतर CBI च्या संचालकपदी ऋषीकुमार शुक्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2019 05:36 PM2019-02-02T17:36:42+5:302019-02-02T17:37:47+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी निवड समितीचे अध्यक्ष असून, न्यायमूर्ती सिक्री आणि लोकसभेतील विरोधी पक्षाचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे हे दोन सदस्य आहेत.
नवी दिल्ली - वरिष्ठ आयपीएस अधिकारी ऋषीकुमार शुक्ला यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्ला हे 1983 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. लवकरच ते आपला पदभार स्वीकारतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समितीच्या बैठकीत शनिवारी सीबीआयच्या नवीन संचालकांची घोषणा करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी निवड समितीचे अध्यक्ष असून, न्यायमूर्ती सिक्री आणि लोकसभेतील विरोधी पक्षाचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे हे दोन सदस्य आहेत. सीबीआयच्या नवीन प्रमुखांच्या नियुक्तीसंदर्भात पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील शुक्रवारी (1 फेब्रुवारी) पार पडलेल्या निवड समितीच्या दुसऱ्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नव्हता. त्यामुळे सीबीआयच्या नवीन संचालकांची नियुक्ती आज झालेल्या बैठकीत करण्यात आली. त्यानुसार, सीबीआयचे संचालक म्हणून ऋषीकुमार शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ऋषी कुमार शुक्ला सीबीआयचे नवे संचालक, शुक्ला 1983 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी #CBIDirector
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) February 2, 2019
IPS Rishi Kumar Shukla has been appointed as the new Director, Central Bureau of Investigation (CBI) pic.twitter.com/uaT7gN6Nij
— ANI (@ANI) February 2, 2019
The Appointments Committee of the Cabinet has approved the appointment of IPS Rishi Kumar Shukla as the new CBI Director for a period of two years from the date of assumption of charge of the office. https://t.co/o7vVFbkPBb
— ANI (@ANI) February 2, 2019