PM नरेंद्र मोदी उपचाराचा सगळा खर्च स्वतःच करतात, सरकारचा रुपयाही खर्च नाही; RTI मधून माहिती उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 12:53 PM2023-01-09T12:53:19+5:302023-01-09T13:03:55+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या नेत्यांपैकी एक आहेत. पीएम मोदी अनेक कारणांनी सतत चर्चेत असतात. १८ तास कामामुळे ते चर्चेत असतात.

PM Modi bears his own medical expenses, no government money spent on it RTI | PM नरेंद्र मोदी उपचाराचा सगळा खर्च स्वतःच करतात, सरकारचा रुपयाही खर्च नाही; RTI मधून माहिती उघड

PM नरेंद्र मोदी उपचाराचा सगळा खर्च स्वतःच करतात, सरकारचा रुपयाही खर्च नाही; RTI मधून माहिती उघड

googlenewsNext

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या नेत्यांपैकी एक आहेत. पीएम मोदी अनेक कारणांनी सतत चर्चेत असतात. १८ तास कामामुळे ते चर्चेत असतात. मोदींसंदर्भात आणखी एक माहिती उघड झाली आहे. मे 2014 मध्ये त्यांनी पंतप्रधानपद स्वीकारल्यापासून त्यांच्या वैद्यकीय खर्चावर सरकारी तिजोरीवर एक रुपयाही खर्च झाला नाही, ही माहिती आरटीआयमधून उघड झाली आहे. 

पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी दाखल केलेल्या आरटीआय अर्जाला पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या उत्तरात ही बाब उघड झाली आहे. 'पंतप्रधान कार्यालयाने देखभाल केलेल्या पंतप्रधानांवर कोणताही खर्च केला जात नाही, असं यात म्हटले आहे. 

थोडी घेता का? असा कुणी आग्रह करत असेल तर सावध व्हा: WHO चा चिंताजनक रिपोर्ट

आपल्याकडे खासदार आमदारांना विषेश सुविधा दिल्या जातात. या वैद्यकीय खर्चही दिला जातो. पंतप्रधान मोदी मात्र स्वत:च्या खिशातून वैद्यकीय खर्च करतात. सरकारच्या तिजोरीतून एक रुपयाही खर्च या पर्समधून एक रुपयाही खर्च केला जात नाही.

पंतप्रधान कार्यालयाने आरटीआयद्वारे विचारलेल्या प्रश्नावर ही माहिती दिली आहे. पंतप्रधान कार्यालयाचे सचिव, विनोद बिहारी सिंह यांनी माहिती अधिकाराला उत्तर दिले आहे. यात सरकारी बजेटमधील एक रुपयाही पंतप्रधानांच्या वैयक्तिक वैद्यकीय उपचारांसाठी वापरला जात नाही, असं म्हटले आहे.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक वैद्यकीय उपचारांवर कोणताही खर्च करण्यात आलेला नाही," असे आरटीआयच्या उत्तरात म्हटले आहे. "भारत आणि परदेशात 2014 पासून आजपर्यंत कोणताही खर्च करण्यात आलेला नाही", असं या उत्तरात म्हटले आहे. 

"पंतप्रधान मोदीजींनी फिट इंडिया योजनेद्वारे फक्त एक मजबूत संदेश दिला नाही तर ते स्वतःचे उदाहरण घालून 135 कोटी भारतीयांना तंदुरुस्त राहण्यासाठी प्रेरित करत आहेत," असं प्रफुल्ल सारडा म्हणाले."करदात्यांच्या पैशाचा वापर पीएमओच्या कोणत्याही वैयक्तिक कामासाठी केला जात नाही, यामुळे प्रशासनावरील आमचा विश्वास वाढतो. खासदार आणि आमदारांनीही त्यांचा वैयक्तिक वैद्यकीय खर्च असल्यास तोच मार्ग स्वीकारला पाहिजे,असंही सारडा म्हणाले.

Web Title: PM Modi bears his own medical expenses, no government money spent on it RTI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.