कोण आहे 'ही' महिला? जिच्यासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले नतमस्तक, 'मन की बात'मध्येही उल्लेख!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 02:07 PM2024-05-30T14:07:16+5:302024-05-30T14:11:43+5:30
Lok Sabha Elections 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ओडिशातील केंद्रपारा येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. या रॅलीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रपारा येथील एका महिलेसमोर नतमस्तक झाल्याचा भावनिक क्षणही पाहायला मिळाला.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या व शेवटच्या टप्प्यातील प्रचार आज संपणार आहे. या निवडणुकीसाठी १ जून रोजी मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ओडिशातील केंद्रपारा येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. या रॅलीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रपारा येथील एका महिलेसमोर नतमस्तक झाल्याचा भावनिक क्षणही पाहायला मिळाला. या घटनेपासून ही महिला कोण, अशी चर्चा सुरू आहे.
ही महिला केंद्रपारा येथील कमला मोहराणा आहे. कचऱ्यापासून विविध अनोख्या वस्तू बनवण्यासाठी कमला मोहराणा प्रसिद्ध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी काल केंद्रपाडा येथे निवडणूक रॅलीसाठी गेले होते. यावेळी येथे त्यांची कमला मोहराणा यांच्याशी भेट झाली. कमला मोहराणा एका स्वयं-सहायता गटाच्या भाग आहेत आणि 'वेस्ट टू वेल्थ' तसेच महिला सक्षमीकरणावर काम करतात.
गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बात कार्यक्रमातही त्यांचा उल्लेख झाला होता. तसेच, कमला मोहराणा यांनी नुकतीच वेस्ट मालापासून बनवलेली राखीही नरेंद्र मोदींना पाठवली होती. ओडिशातील केंद्रपारा येथील रहिवासी असलेल्या कमला महाराणा या ६३ वर्षीय आहेत. त्या केंद्रपारा येथील गुलनगर भागात कमला मावशी म्हणून प्रसिद्ध आहेत. कमला महाराणा या महिला बचत गट (SHG) चालवतात. हा गट टाकाऊ दुधाच्या पाऊच आणि इतर प्लास्टिक सामग्रीचा पुनर्वापर करून घरगुती वस्तू बनवतो.
दरम्यान, गेल्या वर्षी २६ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात कमला मोहराणा यांच्या कचऱ्यापासून पैसे कमावण्याच्या उपक्रमाचा उल्लेख केला होता. कमला महाराणा यांच्या कर्तृत्वाबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, कमला महाराणा यांनी स्वच्छ भारत अभियानाला नवा आयाम दिला आहे. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कमला महाराणा यांना आपली बहीण असे संबोधित केले होते.
मन की बात कार्यक्रम के 100 एपिसोड पूरे होने को हैं। ऐसे में कुछ स्वच्छता योद्धाओं की कहानियां प्रासंगिक हो जाती हैं। उन्हीं में से एक है ओडिशा में प्लास्टिक वेस्ट से आमदनी की राह तलाशने वाली कमला मोहराना का संगठन, जिसे पीएम से मन की बात में सराहना भी मिली।#MannKiBaatAt100pic.twitter.com/MBoNYfZMoO
— Swachh Bharat Urban (@SwachhBharatGov) April 29, 2023